शाहरुख खान आणि सलमान खान यांचे चाहते अमाप आहेत, त्यांच्या चित्रपटांची ते उत्सुकतेने वाटही पाहत असतात. आता ते 'टायगर व्हर्सेस पठाण' या चित्रपटासाठी एकत्र येणार होते. मध्यंतरी असे कळले की, हा चित्रपट डब्यात गेला, परंतु मोठी स्पाय थ्रिलर फिल्म अजूनही बंद पडलेली नाही.
आता यशराज फिल्म्सकडून समोर आलेल्या माहितीनुसार, हा प्रोजेक्ट अजूनही सुरू असून, नव्या पद्धतीने त्याची तयारी केली जात आहे. 'पठाण' या २०२३ मधील सुपरहिट चित्रपटाने शाहरुख खानला स्पाय युनिव्हर्समध्ये एन्ट्री मिळवून दिली. त्या चित्रपटात सलमान खानने टायगर म्हणून स्पेशल एन्ट्री घेतली होती. त्याचवेळी 'टायगर व्हर्सेस पठाण' या आगामी चित्रपटाचीही घोषणा झाली होती, मात्र त्यानंतर दीर्घकाळ या चित्रपटाबद्दल कोणतीही अधिकृत अपडेट मिळाली नव्हती.
त्यामुळे अनेकांनी असा अंदाज लावला की हा प्रोजेक्ट आता बंद झाला आहे, मात्र काही मीडिया रिपोर्टनुसार निर्माता आदित्य चोप्रा हे या चित्रपटाची कथा अधिक मोठ्या प्रमाणात आणि नव्या अंदाजात सादर करण्याच्या तयारीत आहेत.