भारताचा सर्वात मोठा LVM३ रॉकेट केला लाँच!

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
LVM३ रॉकेट
LVM३ रॉकेट

 

इस्रोने आज एकासोबत ३६ उपग्रह लाँच केले. ब्रिटिश कंपनीच्या उपग्रहांना घेऊन LVM-३ रॉकेटने सकाळी ९  वाजता श्री हरिकोटावरुन अवकाशात आकाशात उड्डाण घेतली.

 

विशेष म्हणजे हे रॉकेट आपल्यासोबत अंतराळात एकत्र ३६  सॅटेलाइट घेऊन गेल्याने एक वेगळा इतिहास रचलाय.

 

साडे ४३  मीटर लांबीच्या इस्रोच्या या रॉकेटनी ब्रिटेनच्या एका कंपनीचे ३६ उपग्रह आपल्यासोबत घेऊन अवकाशात झेप घेतली. उपग्रहांना घेऊन LVM-३  ने झेप घेतल्यानंतर त्याचं एकूण वजन ५  हजार ८०५ टन आहे. या मिशनला LVM3-M-३ /वनवेब इंडिया-३  असं नाव देण्यात आलं. इस्रोने ट्वीट करुन या मिशनच्या लाँचिगची माहिती दिली होती.

 

 

७२ उपग्रह लाँच करण्याचा करार

LVM3 इस्रोचा सर्वात मोठा रॉकेट आहे ज्याने आता पर्यंत पाच वेळा यशस्वी उड्डाण केले आहे. ज्यामध्ये चंद्रयान-२  मिशनसुद्धा सहभागी आहे. मुळात ब्रिटेनची वनवेब ग्रुप कंपनीने इस्रोच्या वाणिज्यिक शाखा न्यूस्पेस इंडिया लिमिटेडपासून ७२  उपग्रह लाँच करण्याचा करार केला आहे.

२३ उपग्रह पृथ्वीच्या कक्षात

यामध्ये २३ ऑक्टोबर २०२२  ला २३  उपग्रह इस्रोने याआधीच लाँच केले होते. आज बाकी असलेले २३  उपग्रह पृथ्वीच्या कक्षात जाणार. इस्रोच्या या लाँचिगमुळे पृथ्वीच्या कक्षेत वेब वन कंपनीचे उपग्रहांची एकूण संख्या ६१६  होणार. इस्रोचा या वर्षीचा हा दुसरा लाँच आहे.

इस्रोची ही लाँचिग यशस्वी झाली तर

जर ही लाँचिग यशस्वी झाली तर वनवेब इंडिया-२ स्पेस मध्ये ६०० पेक्षा जास्त लोअर अर्थ ऑर्बिट सेटेलाइट्सच्या कान्स्टलेशन पुर्ण करणार. सोबतच यामुळे जगातील प्रत्येक स्पेस आधारीत ब्रॉडबँड इंटरनेट योजनामध्ये मदत मिळणार.