अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर असेच काहीस चित्र सध्या पंढरपुरात पाहायला मिळत आहे. आज आषाढी एकादशीचा सोहळा आहे. यंदा आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली.
महापूजा संपन्न झाल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली. विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच वारकऱ्यांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. सावळ्या विठुरायाच्या दर्शनानंतर भाविक आनंदी झाले. 'राज्यात भरपूर पाऊस पाणी पडू दे, माझा बळीराजा सुखी आणि समाधानी राहू दे, असं साकडं आपण विठुरायाच्या चरणी घातल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं'.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठल ऋक्मिणीची पूजा केली. यावेळी पूजेदरम्यान विठ्ठलाला सुंदर अशी भरजरी वस्त्रे परिधान करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळाली. सोबतच ऋक्मिणी मातेलाही हिरवी आणि लाल-केशरी सोनेरी काठची पैठणी नेसविण्यात आली. यावेळी विठ्ठल रूक्मिणीचे रूप हे खूपच सुंदर दिसत आहे.
पहाटेच्या पूजेवेळी विठ्ठल रूक्मिणी यांना सजविण्यात आले. यावेळी विठ्ठलाला जांभळ्या रंगाचे सोवळं परिधान करण्यात आले. तर पिस्ता रंगाचा भरजरी नक्षीकाम असलेला सुंदर रेशमी कुर्ता परिधान करण्यात आला.
आजचा दिवस हा आपल्या सर्वांसाठीच खास आहे कारण आपण सगळेच या दिवसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतो. यावेळी श्री विठ्ठल आणि ऋक्मिणी मातेचे रूपही सजले आहे. त्यांना सुंदर पारंपरिक रेशमी वस्त्रांनी सजविण्यात आले आहे.
विठ्ठल ऋक्मिणीचे हे देखणे रूप खूपच सुंदर दिसत आहे. रेशमी वस्त्रांनी सजविण्यात आलेल्या आपल्या विठुरायाला आणि ऋक्मिणीला पाहण्यासाठी, भाविक पंढरपूर येथे हजेरी लावत आहेत.
आज ऋक्मिणी मातेचेही रूप पाहण्यासारखे आहे. सुंदर मेंदीच्या रंगाची आणि लाल-केशरी सोनेरी काठ असलेली नक्षीदार पैठणी ऋक्मिणी मातेला परिधान करण्यात आली. सोबत नथही घालण्यात आली आहे. तसेच मंगळसूत्रही परिधान करण्यात आले आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -