जम्मू काश्मीरमध्ये तब्बल १० वर्षांनंतर होणार निवडणुका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 20 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

केंद्रशासित प्रदेश घोषित केल्यानंतर २०१४ नंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणुका होत असून आज निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्या. जम्मू काश्मीरमध्ये १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर या तीन टप्प्यात मतदान होणार आहे. तर ४ ऑक्टोबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे. अमरनाथ यात्रा १९ ऑगस्ट रोजी संपणार आहे, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जम्मू काश्मीरमध्ये निवडणुकीची धामधूम सुरु होणार आहे. निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी माहिती दिली

लोकसभा निवडणूक २०१४ ही या वेळची सर्वात मोठी निवडणूक प्रक्रिया होती. देशभरात निवडणुकीचं पर्व आनंदात साजर झालं. आपल्या लोकसभा निवडणुकीने जगभरात एक चांगला संदेश गेला आहे. जम्मू काश्मीर आणि हरियाणा दोन्ही राज्यात आयोगाने दौरा केला. तिथे अनेक लोकांशी आम्ही चर्चा केली. सगळ्या राजकीय पक्षांसोबत चर्चा केली, त्यांनी लवकरात लवकर निवडणुका घेण्याची विनंती केली. जम्मू काश्मीरमधे लोकसभा निवडणुकीवेळी लोकांनी मोठ्या रांगा लावून मतदान केलं. जम्मू काश्मीरच्या लोकांनी बुलेट ऐवजी बॅलेट निवडलं, असं निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलं आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत. २०१४ मध्ये येथे शेवटची विधानसभा निवडणूक झाली होती. यावेळी जम्मू काश्मीरमधे ९० जागा आहेत, त्यामधील ७४ जागा जनरल आहेत. बाकी जागा आरक्षित आहेत. जम्मू काश्मीरमध्ये एकूण ८७.०९ लाख मतदार आहेत, ३.७१ लाख मतदार हे पहिल्यांदा मतदान करतील.

निवडणूक आयुक्त काय म्हणाले ?
लोकसभा निवडणूक २०२४ ही या वेळची सर्वात मोठी निवडणूक प्रक्रिया होती. देशभरात निवडणुकीचं पर्व आनंदात साजर झालं. आपल्या लोकसभा निवडणुकीने जगभरात मेसेज गेला. जम्मू काश्मीर आणि हरियाणा दोन्ही राज्यात आयोगाने दौरा केला. तिथे अनेक लोकांशी आम्ही चर्चा केली. सगळ्या राजकीय पक्षांसोबत चर्चा केली, त्यांनी लवकरात लवकर निवडणुका घेण्याची विनंती केली. जम्मू काश्मीरमधे लोकसभा निवडणुकीवेळी लोकांनी मोठ्या रांगा लावून मतदान केलं. जम्मू काश्मीरच्या लोकांनी बुलेट ऐवजी ब्यालेट निवडलं, निवडणुकीचा प्रचार कुठल्याही दहशातिशिवाय झाला पाहिजे, असे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.

गेल्या निवडणुकीत जम्मू काश्मीरमध्ये कुणाला किती जागा मिळाल्या ?
जम्मू-कश्मीरमध्ये २०१४ विधानसभेल ८७ जागांवर मतदान झाले. त्यामध्ये २८ जागांवर पीडीपीला विजय मिळाला. तर भाजपच्या खात्यात २५ जागा होत्या. नॅशनल कॉन्फ्रेंसने १५ जागांवर बाजी मारली होती. तर काँग्रेसने १२ जागा जिंकल्या होत्या. सात जागांवर अपक्षांनी विजय मिळवला होता.

जम्मू-कश्मीरमध्ये किती विधानसभा जागा?
जम्मू-कश्मीर विधानसभा हा केंद्रशासित प्रदेश आहे. संपूर्ण राज्याचा दर्जा संपल्यानंतर विधानसभेचे चित्र बदलले आहे. आता जम्मू काश्मीरमध्ये ९० जागा असतील, ज्यामधील ४३ जागा काश्मीर विभागात येतात, तर ४७ जागा जम्मू विभागात येतात. याधी ८७ जागांवर मतदान होत होतं, यावेळी ९० जागांवर मतदान होईल.