गुजरातच्या सीमेवर NCB आणि ATS ची मोठी कारवाई

Story by  Saurabh Chandanshive | Published by  Saurabh Chandanshive • 16 d ago
NCB आणि ATS ची मोठी कारवाई
NCB आणि ATS ची मोठी कारवाई

 

भारतीय तटरक्षक दलाने गुजराच्या सीमेपासून दूर आंतरराष्ट्रीय समुद्री बॉर्डर लाईनच्या जवळ ८० किलो ड्रग्ससह १४ पाकिस्तानी नागरिकांना अटक केली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि गुजरात एटीएससोबत झालेल्या संयुक्त ऑपरेशनमध्ये ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. मागच्या काही दिवसांपासून गुप्त माहितीच्या आधरावर एजन्सींचं ऑफरेशन सुरु आहे.

भारतीय तटरक्षक दलाने एक्सवर पोस्ट केली. त्यामध्ये म्हटलंय की, गुजरात एटीएस आणि एनसीबीच्या वतीने समुद्रात रात्रभर झालेल्या कारवाईमध्ये पश्चिम अरबी समुद्रात एक पाकिस्तानी बोट पकडली. ज्यात १४ पाकिस्तानी क्रू मेंबर होते. त्यांच्याजवळ ८० किलो ड्रग्ज पकडलं. ज्याती किंमत ६०० कोटी इतकी आहे.

याच वर्षात फेब्रुवारी महिन्यात एनसीबी आणि भारतीय नौदलाने गुजरातच्या किनारपट्टीजवळ आजवरचं सगळ्यात जास्त प्रमाणावर ड्रग्ज पकडलं होतं. त्यावेळी संयुक्त कारवाईमध्ये ३ हजार १३२ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं होतं. त्याची किंमत एक हजार कोटींपेक्षा जास्त होती. नौदलाने ते जहाज ताब्यात घेतले आणि पाच जणांना अटक केली होती.