-अब्दुल कादर मुकादम
इस्लामचा विचार आणि अभ्यास राजकीय दृष्टिकोनातून जितका झाला आहे त्याच्या शतांशानेही त्याचा सांस्कृतिक व ज्ञानक्षेत्रातील योगदानाचा झालेला नाही. किंबहुना इस्लामचे असे काही योगदान आहे, हेच अनेकांना मान्य नाही; पण इस्लामच्या पहिल्या तीन-चार शतकांच्या इतिहासावर नजर टाकली तरी हे योगदान किती व्यापक आणि महत्त्वपूर्ण आहे, याची कल्पना येऊ शकेल. ग्रीक भाषेतील तत्त्वज्ञान, विज्ञान, वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगोल, खगोलशास्त्र अशा अनेक ज्ञानशाखेतील ज्ञान अरब संशोधकांनी आणि अभ्यासकांनी नवव्या ते तेराव्या शतकाच्या काळात अरबी भाषेत भाषांतरित केले व तेथूनच ते युरोपात गेले. म्हणूनच या काळखंडाला इस्लामच्या इतिहासात भाषांतर युग म्हटले जाते. अरबांच्या या ज्ञान लालसेसंदर्भात रॉम लॅंडो या पाश्चात्त्य अभ्यासकाने फार मार्मिक टिप्पणी केली आहे. त्याने म्हटले आहे, की इस्लामपूर्व काळातील अरब समज, ज्ञान आणि संस्कृतीच्ë...
read more