सलमानने साजरा केला धोनीचा वाढदिवस

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 14 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

आज सगळ्यांचा लाडका कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनीचा वाढदिवस आहे. सगळीकडून धोनीवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. सोशल मीडियावर त्याचे चाहते त्याच्यासाठी काही ना काही खास गोष्ट शेअर करत आहेत. तर अभिनेता सलमान खाननेही धोनीचा वाढदिवस साजरा केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेत आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याला धोनी त्याच्या पत्नीबरोबर सध्या मुंबईमध्ये राहतोय. यंदा त्याने त्याचा वाढदिवस अभिनेता सलमान खानबरोबर गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये साजरा केला. यावेळी त्याची पत्नी साक्षी सुद्धा उपस्थित होती तर सलमानच्या घरची काही मंडळीही उपस्थित होती.

धोनीने केक कापल्यानंतर सलमान आणि साक्षीला केक भरवला. त्यानंतर साक्षी धोनीच्या पाया पडली आणि त्याचे आशीर्वाद घेतले पण त्यावेळी तिने दिलेल्या एक्स्प्रेशनने सगळ्यांना हसू अनावर झालं.

साक्षीने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला असून तिने त्याला हॅपी बर्थडे अशा शुभेच्छाही दिल्या. साक्षीने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रणवीर सिंह, बिपाशा बसु यांनीही या व्हिडिओवर कमेंट करत धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. 
 
सलमानला धोनी हा क्रिकेटर म्हणून खूप आवडत असल्याची कबुली अनेक मुलाखतींमध्ये दिली आहे पण लवकरच या जोडीची मैत्री झाली. धोनी सलमानच्या घरच्या अनेक कार्यक्रमांनाही उपस्थित असतो. अनेकदा साक्षीनेही सलमानच्या घरी होणाऱ्या अनेक पार्टीजना हजेरी लावली आहे.

पापाराझींबरोबर धोनीची मस्ती
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्याला धोनी आणि साक्षीने हजेरी लावली होती. यावेळी फोटो काढताना पापाराझींनी धोनीला ७ तारखेला त्याचा वाढदिवस असल्याची आठवण करून दिली. यावेळी धोनीने त्यांना माझ्यासाठी गिफ्ट घेऊन या असं सांगितलं. धोनीचा हा अंदाज सगळ्यांना आवडला.

आयपीएल २०२५
धोनी आयपीएल २०२५ मध्ये खेळणार कि नाही याबाबत अजून चाहत्यांच्या मनात साशंकता आहे. त्याने २०२५ ची आयपीएल मॅच खेळावी म्हणून अनेक चाहते प्रार्थना करत आहेत पण धोनीने याबाबत अजून काहीही वक्तव्य केलेलं नाहीये. आयपीएल सुरु होण्या अगोदर तो त्याचा निर्णय जाहीर करेल असा सगळ्यांचा अंदाज आहे.