'अंजुमन-ए-इस्लाम'मध्ये 'अशा' आहेत शैक्षणिक संधी

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Months ago
अंजुमन-ए-इस्लाम
अंजुमन-ए-इस्लाम

 

मुस्लीम समाजातील मुलं शिक्षणाच्या प्रवाहात यावीत यासाठी तब्बल दीडशे वर्षांपूर्वी मुंबईमध्ये उर्दू शाळा सुरू करण्यात आली. ‘अंजुमन-ए-इस्लाम’ (https://anjumaniislam.org) या नावाने सुरू झालेली ही शाळा आता देशातली महत्त्वाची संस्था म्हणून नावारूपाला आली आहे. या संस्थेतील विविध शैक्षणिक शाळा, महाविद्यालयांची माहिती सांगणारा हा लेख.

'अंजुमन-ए-इस्लाम’ची ऐतिहासिक वाटचाल  
तब्बल दीडशे वर्षांपूर्वी मुंबईतील काही आधुनिकतावादी मुस्लीम विचारवंतांनी एकत्र येऊन ‘अंजुमन-ए-इस्लाम’ या शाळेची स्थापना केली. अलीगढ मुस्लीम विद्यापीठ (एएमयू) स्थापन होण्याच्या एक वर्ष आधी म्हणजे फेब्रुवारी १८७४ मध्ये 'अंजुमन'ची स्थापना झाली. मुस्लीम समाजाला आधुनिक शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून 'अंजुमन'च्या स्थापनेचा निर्णय समाजातील काही धुरिणांनी घेतला. मुंबई उच्च न्यायालयातील पहिले भारतीय बॅरिस्टर बद्रुद्दीन तैयबजी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तिसरे अध्यक्ष कमरुद्दीन तैयबजी, त्यांचे मोठे बंधू आणि पहिले भारतीय वकील नाखुदा मोहम्मद अली रोगे, व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ता गुलाम मोहम्मद मुन्शी यांच्या पुढाकारानं तत्कालीन मुंबई प्रांतातील उमरखाडीजवळील बाबुला टाकी इथं एका छोट्याशा जागेत 'अंजुमन-ए-इस्लाम'ची शाळा सुरू करण्यात आली. पुढे १८९३ मध्ये 'अंजुमन-ए-इस्लाम' 'व्हिक्टोरिया टर्मिनल्स'समोरील (छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनल्स) इमारतीत ही शाळा हलवण्यात आली. तेव्हापासून आजतागायत शाळा तिथंच भरते.

असा आहे 'अंजुमन-ए-इस्लाम'चा विस्तार 
`अंजुमन`मधील शाळा, महाविद्यालयं आणि इतर केंद्राची संख्या ९७ इतकी आहे. यात पूर्वप्राथमिक शाळा (१५), प्राथमिक शाळा (१५), माध्यमिक शाळा (२०), कनिष्ठ महाविद्यालयं (१०), पॉलिटेक्निक (४), पदवी महाविद्यालयं (१५), इतर संस्था (१०), प्रस्तावित संस्था (२), वसतिगृह (२), सभागृह (३), सहारा युनिट्स (२) आणि अनाथाश्रम (२) अशी विभागणी आहे. संस्थेच्या तीन एकर परिसरात पाच महाविद्यालय - दोन केटरिंग महाविद्यालय, व्यवसाय-व्यवस्थापन महाविद्यालय, गृहविज्ञान महाविद्यालय आणि एक कायदा महाविद्यालय स्थापन करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त, महिलांसाठी एक पॉलिटेक्निक, एक कनिष्ठ महाविद्यालय, इंग्लिश आणि उर्दू अशा दोन्ही माध्यमांच्या दोन शाळा आहेत. या आवारातच एक मोठं ग्रंथालय आणि एक संशोधन केंद्रदेखील आहे. विद्यार्थ्यांना कमीत कमी खर्चात दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ३००० कर्मचारी इथं कार्यरत आहेत. अभियांत्रिकी, औषध, आर्किटेक्चर, फार्मसी, हॉस्पिटॅलिटी, केटरिंग आणि हॉटेल-मॅनेजमेंट, कायदा, व्यवसाय प्रशासन, गृहविज्ञान, शिक्षक प्रशिक्षण या विविध अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे.

अंजुमनच्या अनुदानित संस्था

१. एमएचएसबू सिद्दिक पॉलिटेक्निक महाविद्यालय 
पत्ता : अंजुमन-ए-इस्लामचे एमएचएसबू सिद्दिक पॉलिटेक्निक, 
साबू सिद्दिक पॉलिटेक्निक रोड, भायखळा, मुंबई-400008
संस्थेच्या प्रमुखाचे नाव : डॉ. कुरेशी अब्दुल कादिर ए. गणी
फोन नं : 022-23052252, 23084881/82
मोबाईल नं : 9970178118
ईमेल : [email protected]

२. अकबर पीरभॉय कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स
पत्ता : अंजुमन-ए-इस्लामचे अकबर पीरभॉय कॉलेज ऑफ कॉमर्स अँड 
इकॉनॉमिक्स, मौलाना शौकतली रोड, दो टाकी, ग्रँट रोड (पूर्व), मुंबई-400008.
संस्थेच्या प्रमुखाचे नाव : प्रो. मोहम्मद ताहिर
फोन नं : 23074122
मोबाईल नं : 8108100784
ईमेल : [email protected]
अधिकृत वेबसाईट : www.apcollege.in 

३. डॉ. एम. इशाक जमखानवाला टिब्बिया युनानी मेडिकल कॉलेज आणि हाजी एआर काळसेकर टिब्बिया हॉस्पिटल
पत्ता : अंजुमन-ए-इस्लाम कॉम्प्लेक्स, 60, फिशरीज युनिव्हर्सिटी रोड, 
यारी रोड, अंधेरी [प.], मुंबई - 400 061
संस्थेच्या प्रमुखाचे नाव : डॉ. रशीद अन्वर काझी (प्रभारी प्राचार्य व अधीक्षक टिब्बिया)
मोबाईल नं : ९८६९१७८१४९

४. अहमद सेलर प्रायमरी स्कूल
पत्ता : अंजुमन-इ-इस्लामचे अहमद सेलर प्रायमरी स्कूल
१२५, दिमतीमकर रोड, नागपाडा, मुंबई-४०० ००८
संस्थेच्या प्रमुखाचे नाव : रुही समीर
मोबाईल नं : 9987861567
फोन नं : 23015019
ईमेल : [email protected]

अनुदानित माध्यमिक शाळा

१. बद्रुद्दीन तैयबजी उर्दू हायस्कूल, सीएसटी   
२. अहमद सेलर हायस्कूल 
३. जेएमसी हायस्कूल ऑफ कॉमर्स (दिवस)
४. जेएमसी हायस्कूल ऑफ कॉमर्स (रात्री)
५. अब्दुस सत्तार शुएब माध्यमिक विद्यालय 
६. एम.एस.एस.एस टेक्निकल हायस्कूल 
७. सैफ तैयबजी गर्ल्स हायस्कूल
८. एमआयजे गर्ल्स हायस्कूल, वांद्रे 
९. अल्लाना बॉईज उर्दू हायस्कूल, कुर्ला 
१०. अल्लाना गर्ल्स उर्दू हायस्कूल, कुर्ला  
११. बेगम जमिला हाजी अब्दुल हक उर्दू हायस्कूल फॉर गर्ल्स, वर्सोवा 
१२. मुस्तुफा फकीह हायस्कूल, वाशी 
१३. पीर मोहम्मद हायस्कूल, पुणे 
१४. पब्लिक स्कूल, पाचगणी     

विना अनुदानित माध्यमिक शाळा

१. अल्लाना इंग्लिश हायस्कूल
पत्ता : ९२, डॉ. डीएन रोड सीएसटी मुंबई-४००००१ 
संस्थेच्या प्रमुखाचे नाव : रिजवाना सतारे
मोबाईल नं : ९८७०७१६३०७ 
फोन नं : ०२२२२६२०९२३
ईमेल : [email protected]

२. बेगम शरीफा काळसेकर गर्ल्स इंग्लिश हायस्कूल
पत्ता : साबू बाग, २६० जेबिबी मार्ग, (बेलासिस रोड), मुंबई-४००००८ 
संस्थेच्या प्रमुखाचे नाव : अन्सारी फौजिया गुलाम मोहम्मद.
मोबाईल नं : ९८१९२८३१०६
फोन नं : ०२२ २३०११६०६ 
ईमेल : [email protected]
अधिकृत वेबसाईट : www.anjumanbskschool.edu.in

३. अल्लाना इंग्लिश हायस्कूल कुर्ला
पत्ता : एसजी बर्वे मार्ग सीएसटी रोड मुंबई-४०००७०
संस्थेच्या प्रमुखाचे नाव : गजाला डी. शेख
मोबाईल नं : ९३२४३४८२५९
फोन नं : ०२२-२५०३४५४०
ईमेल : [email protected]

४. ए.आय. हायस्कूल (इंग्रजी माध्यम), वर्सोवा
पत्ता : बावला कॅम्पस, यारी रोड, वर्सोवा अंधेरी (प.) मुंबई-४०००६१ 
संस्थेच्या प्रमुखाचे नाव : जेबा अख्तरी शेख
मोबाईल नं : ९८६९१७५३७० 
फोन नं : २६३३२२६७
ईमेल : [email protected]

५. अब्दुल अझीम खटखटय इंग्लिश माध्यमिक विद्यालय
पत्ता : प्लॉट क्रमांक १५, सेक्टर १०/ए, वाशी, नवी मुंबई-४००७०३.
संस्थेच्या प्रमुखाचे नाव : झुलेखा सिद्दीकी
मोबाईल नं : ९८२१४११३८६ 
फोन नं : ०२२२७८९१०४०
ईमेल : [email protected]

६. अहमद पीर मोहम्मद इंग्लिश मीडियम हायस्कूल
पत्ता : २५, बंड गार्डन रोड, पुणे-४११००१ 
संस्थेच्या प्रमुखाचे नाव : एच.एम.अस्मा शेख
फोन नं : ०२०२६१६०६१५
ईमेल : [email protected]

प्राथमिक शाळा 

१. अल्लाना इंग्लिश प्रायमरी स्कूल
पत्ता : बद्रुद्दीन तयबजी मार्ग, ऑफ, ९२, डीएन रोड, सीएसटी, मुंबई-४०००००१ 
संस्थेच्या प्रमुखाचे नाव : सगीरा शफीक
मोबाईल नं : ९८९२६६४७८७
फोन नं : ०२२- २२६२६७१७ /०२२-२२६२५३२५.
ईमेल : [email protected]

२. बेगम शरीफा काळसेकर मुलींची प्राथमिक इंग्रजी शाळा
पत्ता : २६०, जेबीबी मार्ग, (बेलासिस रोड), नागपाडा, मुंबई-४००००८ 
संस्थेच्या प्रमुखाचे नाव : शरमीन आर सय्यद.
मोबाईल नं : ९८१९४४३६४०
फोन नं : ०२२२३०५१५०५ 
ईमेल : [email protected]

३. अल्लाना इंग्लिश प्रायमरी स्कूल, कुर्ला
पत्ता : सीएसटी रोड, कुर्ला, मुंबई-४०००७० 
फोन नं : ०२२२५०३४५३९
ईमेल : [email protected]

४. अंजुमन-इ-इस्लाम प्राथमिक शाळा [इंग्रजी. MED]
पत्ता : बावला कॅम्पस यारी रोड वर्सोवा अंधेरी[पश्चिम] मुंबई-६१
संस्थेच्या प्रमुखाचे नाव : मेहजबीन खान
मोबाईल नं : ९८३३२४६४९१
फोन नं : ०२२२६३४३९२१
ईमेल : [email protected]

५. अब्दुल अझीम खटखते इंग्रजी प्राथमिक शाळा
पत्ता : प्लॉट क्रमांक १५, सेक्टर १०/ए, वाशी, नवी मुंबई-४००७०३.
संस्थेच्या प्रमुखाचे नाव : बेग राहिया अजमल
मोबाईल नं : ९६१९५२६६१९
फोन नं : ०२२२७६६१०४३.
ईमेल : [email protected]

६. अहमद पीर मोहम्मद इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल
पत्ता : २५, बंड गार्डन रोड, पुणे-४११००१ 
संस्थेच्या प्रमुखाचे नाव : अस्मा अफजल खान
मोबाईल नं : ९९७००६६६९१ 
फोन नं : ०२०-२६१६०६१५.
ईमेल : [email protected]

७. अंजुमन-इ-इस्लाम पब्लिक स्कूल, पाचगणी
पत्ता : पाचगणी, जि. सातारा, ४१२८०६
संस्थेच्या प्रमुखाचे नाव : महेरुख पटेल
मोबाईल नं : ९५७९६२८६०३
फोन नं : ०२१६८ २५०४२३
ईमेल : [email protected]
 

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -


Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter