फहाद फासिलचा 'आवेशम' सुपरहिट

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 11 d ago
आवेशम
आवेशम

 

अभिनेता फहद फॉसिलचा 'पुष्पा' हा चित्रपट 2021 मध्ये रिलीज झाला. या चित्रपटातील त्यानं साकारलेल्या एसपी भंवर सिंग या भूमिकेचं अनेकांनी कौतुक केलं.सध्या फहाद फसिल हा त्याच्या 'आवेशम' (Aavesham) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे.

11 एप्रिल रोजी चित्रपटगृहात रिलीज झालेल्या आवेशम या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. जवळपास 30 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 140 कोटींची कमाई केली आहे.अशातच अनेक जण हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्याची वाट बघत आहेत.

कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणर चित्रपट?
आवेशम हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. रिपोर्टनुसार, 'आवेशम' 17 मे रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे.

'आवेशम' चित्रपटाची स्टार कास्ट
'आवेशम' चित्रपटाचे दिग्दर्शक जीतू माधवन यांनी केलं आहे. या चित्रपटाची कथा देखील त्यांनीच लिहिली आहे. फहदशिवाय रोशन शाहनवाज, मिथुन जयशंकर, मन्सूर अली खान आणि साजिन गोपू हे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना भरपूर ॲक्शन आणि कॉमेडी पाहायला मिळणार आहे. अन्वर रशीद एंटरटेनमेंट आणि फहद फासिल अँड फ्रेंड्स यांनी संयुक्तपणे 'आवेशम'ची निर्मिती केली आहे.

आवेशम चित्रपटाचे कथानक कॉलेज जीवनाची कथा आणि गुंडागर्दीच्या विरोधात ॲक्शन घेणारा हिरो, यावर आधारित आहे.