काश्मीर : लष्कर ए तय्यबाचा टॉप कमांडर चकमकीत ठार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 11 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

दक्षिण काश्मीरच्या कुलगामच्या रेडवानी पाइन भागात दहशतवाद्यांसोबत सुरु असलेल्या चकमकीदरम्यान सुरक्षा यंत्रणांना मोठं यश मिळाले आहे. सुरक्षादलाने या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर बासित अहमद डार याच्यासह तीन दहशतवाद्यांना ठार केले आहे. मारले गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटली नाहीये. आज सकाळी लष्कर कमांडर बासित अहमद डार याला कुलगाम येथे घेरले असल्याची माहिती समोर आली होती. (3 terrorists killed in encounter in Jammu and Kashmir)

सुरक्षा दलांना लष्करच्या ठिकाणांबद्दल गुप्त माहिती मिळाली होती, त्यानंतर सोमवारी सुरक्षा दलांनी परिसरात तपास अभियान सुरू केले. या दरम्यान दहशतवाद्यांनी अचानक फायरिंग सुरू केली, त्यानंतर सुरक्षा दलांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले. काश्मीर झोन पोलीसांनी आपल्या एक्स हँडलवर एक पोस्ट करता माहिती दिली होती की कुलगाम जिल्ह्यातील रेडवानी पाइन भागात चकमक सुरू असून पोलीस आणि सुरक्षा दल काम करत आहेत.

४ मे रोजी झाला होता दहशतवादी हल्ला
जम्मू काश्मीर च्या पुंछ जिल्ह्यात चार मे रोजी दहशतवाद्यांनी भारतीय हवायी दलाच्या ताफ्यावर हल्ला केला होता. सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात आयएएफचा एक जवा शहिद झाला आहे. तर चार इतर जवान जखमी झाले होते.

अधिकाऱ्यांनी सांगितले की हा हल्ला शनिवारी संध्याकाळी झाला जेव्हा हवाई दलाचा ताफा सुरनकोट परीसरातून सनाई टॉपकडे जात होता. या हल्ल्यासाठी जबाबदार दहतवाद्यांचा शोध घेणअयासाठी मोठ्या प्रमाणात शोध मोहिम सुरू करण्यात आली. जम्मू काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात सुरक्षा दलावर झालेला हा वर्षातील दुसरा हल्ला आहे. जानेवारी मध्ये सेनेच्या ताफ्यावर कथित दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता.