भारताच्या नंबर वन बॅडमिंटनपटूची UPSC च्या मैदानातही बाजी

Story by  आवाज़ मराठी | Published by  [email protected] • 1 Months ago
कुहू गर्ग
कुहू गर्ग

 

भारताची बॅडमिंटनपटू कुहू गर्ग हिने फक्त बॅडमिंटन कोर्टमध्येच नाही, तर केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेतही (UPSC) बाजी मारली आहे. मंगळवारी युपीएससी परिक्षेचा निकाल जाहीर झाला. परिक्षेत हजारांहून अधिक उमेदवारांना यश मिळाले असून यात कुहू गर्गचाही समावेश आहे.

खेळाबरोबरच आभ्यासही सांभाळत कुहूने युपीएससी परिक्षेत 178 वा रँक मिळवला आहे. तिला तिच्या कारकिर्दीत तिच्या कुटुंबाकडून मोठी मदत झाली आहे. आजतकशी बोलताना कुहूने सांगितले की तिच्या यशाचे श्रेय तिचे वडील माजी आयपीएस अधिकारी अशोक कुमार यांना दिले आहे.

कुहूची आई अलकनंदा प्रोफेसर आहे. तसेच तिने सांगितले की दुखापतीवेळी केलेली मेहनत आणि बॅडमिंटनमुळे तिला शिस्तीचे महत्त्व कळाले. तिने युपीएसी परिक्षेसाठी एका दिवसात 16-16 तास आभ्यासही केला आहे.

तिला युपीएससीच्या मुलाखतीत क्रिकेटमुळे बाकी खेळ मागे पडत आहेत का, असंही विचारलं होतं. त्यावर तिने सांगितलं होतं की क्रिकेट कोणत्याही खेळाला प्रभावित करत नाहीये, उलट क्रिकेट देशात आणखीच प्रगती करत असून बाकी खेळतही प्रगती करू शकतात.

कुहूने डेहराडूनमधील सेंट जोसेफमधून प्राथमिक शिक्षण घेतले आहे. तसेच एसआरसीसी कॉलेजमधून तिने पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

कुहूने असेही सांगितले की तिला तिच्या मित्रांनी आणि तिच्या सोसायटीत राहणाऱ्या ब्युरोक्रेट्सनेही खुप मदत केली.

बॅडमिंटनमध्येही मिळवले मोठे यश
कुहूने तिच्या बॅडमिंटन कारकिर्दीत 56 ऑल इंडिया मेडल्स मिळवले आहेत, तिने 18 आंतरराष्ट्रीय मेडल्सही तिने जिंकले आहेत आहे. तिची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये मिश्र दुहेरीत सर्वोच्च जागतिक क्रमवारी 34 आहे, तर देशात अव्वल क्रमांक ही तिची सर्वोत्त क्रमवारी राहिली आहे.