बेंगळुरू बॉम्बस्फोटाचे पाकिस्तान कनेक्शन उघड

Story by  आवाज़ मराठी | Published by  [email protected] • 26 d ago
बंगळुरू बॉम्बस्फोट
बंगळुरू बॉम्बस्फोट

 

कर्नाटकातील रामेश्वरम् कॅफेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा कट हा पाकिस्तानातील व्यक्तींनी रचल्याची बाब राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांच्या तपासातून समोर आली आहे. बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी अब्दुल मतीन ताहा आणि मुसावीर हुसेन शाजिब यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचे तपासातून उघड झाले आहे.

अब्दुल मतीन ताहा आणि मुसाविर हुसेन शाजिब हे बॉम्बस्फोटांचे सूत्रधार असल्याचा तपास यंत्रणेचा संशय आहे. पाकिस्तानी कर्नल या टोपणनावाच्या व्यक्तीशी त्याचे संबंध असून तर २०१९-२० पासून तो आयएस-अल-हिंद या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याची माहितीही ‘एनआयएला’ मिळाली आहे.

त्यामुळे एनआयएचे अधिकारी रामेश्वरम् कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात पाकिस्तानच्या सहभागाबाबत अधिक तपास करत आहेत. सूत्रांनी सांगितले की, कर्नल ही व्यक्ती मंगळूर येथे २०२२ च्या कुकर बॉम्बस्फोटात देखील सहभागी होती.

कुक्कार असे संशयित दहशतवाद्याचे नाव असून, तो अबुधाबी येथील कर्नल नावाने राहत असल्याचे समजले आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी त्याचे संबंध आहेत आणि तो भारतात बॉम्ब हल्ल्यांचा कट रचत असल्याचा तपास संस्थांना संशय आहे. इस्लामिक स्टेटचे छोटे गट तयार करणे, त्यात स्थानिक तरुणांची भरती करणे हे त्याचे काम आहे.