देशभरात रामनवमीचा उत्साह, अयोध्येत भाविकांची मांदियाळी

Story by  आवाज़ मराठी | Published by  [email protected] • 1 Months ago
रामलल्ला
रामलल्ला

 

आज देशभरात रामनवमी मोठ्या थाटामाटात साजरा केली जात आहे. यावेळची रामनवमी खूप खास आहे. कारण अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीनंतर ही पहिलीच रामनवमी आहे. यावेळी अयोध्येमध्ये रामलल्लाची विशेष पूजा करण्यात आलीय. मंत्रोच्चारांच्या मंगलध्वनीमध्ये रामलल्लाचा सूर्य किरणांनी अभिषेक झाला आहे.

अयोध्येमध्ये रामनवमी निमित्ताने राम मंदिराची विशेष सजावट करण्यात आली आहे. रामनवमीनिमित्त पहाटे साडेतीन वाजता राम मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले होते. रात्री 11 वाजेपर्यंत भाविकांना रामलल्लाचं दर्शन घेता येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मंदिरात भाविकांची मोठी गर्दी यावेळी पाहायला मिळाली . ठिक 12 वाजूम 16 मिनीटांनी रामलल्लाला सूर्य किरणांनी अभिषेक संपन्न झाला आहे.

अयोध्या भक्तिमय वातावरणात रंगली आहे. मंत्राच्या मंगलध्वनीमध्ये अयोध्येत रामलल्लाचा अभिषेक पार पडला. यावेळी भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली आहे. मागील ५०० वर्षांच्या इतिहासामध्ये आज प्रथमच रामलल्लाला सूर्य किरणांनी अभिषेक घालण्यात आला आहे.यावेळी रामलल्लांची विशेष पूजा देखील करण्यात आली आहे.

आजच्या पूजेच्या खासप्रसंगी दी आणि हातमागाचा वापर करून रामलल्लासाठी खास पोशाख तयार करण्यात आला आहे. तो पिवळ्या रंगाचा आहे. हा पोशाख तयार करताना वैष्णो संप्रदायाच्या प्रतीकांचा वापर करण्यात आला आहे. रामलल्लाचं रूप सूर्य किरणांनी उजळून निघालं होतं. आजचं अयोध्येच्या राम मंदिरातील हे दृश्य अतिशय विलोभनीय होतं.

रामनवमीच्या आजच्या विशेष पूजेसाठी अयोध्येमध्ये ५६ प्रकारचे भोग तयार करण्यात आले आहेत. रामलल्लाला हा नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो भाविकांना देण्यात येत आहे. आज अयोध्येमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अयोध्येमध्ये ५०० वर्षांनंतर धूम धडाक्यात रामनवमी साजरी केली जात आहे. नगरीत रामनवमीची मोठी धूम दिसत आहे.