रिलायन्स मीडिया अन् वॉल्ट डिस्नेची जॉईंट व्हेंचरची घोषणा

Story by  आवाज़ मराठी | Published by  [email protected] • 4 Months ago
रिलायन्स मीडिया, वॉल्ट डिस्नेची
रिलायन्स मीडिया, वॉल्ट डिस्नेची

 

भारतात वॉल्ट डिस्ने आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मीडिया ऑपरेशन्सच्या जॉईंट व्हेंचरची घोषणा करण्यात आलेली आहे. या भागीदारी अंतर्गत दोन कंपन्या एकत्रित आलेल्या असून स्थापन झालेल्या नवीन संस्थेमध्ये ११ हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आलेली आहे.

रिलायन्स आणि डिस्ने या कंपन्यांच्या जॉईंट व्हेंचरची किंमत ७० हजार ३५२ कोटी रुपये इतकी असेल. यामध्ये रिलायन्सचा वाटा ६३.१६ टक्के इतका असेल. तर डिस्नेला ३६.८४ टक्के वाटा मिळेल. विशेष म्हणजे नीता अंबानी दोन्ही कंपन्यांच्या मीडिया ऑपरेशन्सद्वारे स्थापन झालेल्या संयुक्त कंपनीच्या अध्यक्ष असणार आहेत. तर उदय शंकर हे या नवीन कंपनीचे उपाध्यक्ष असतील.

JV RIL या भागीदारीमध्ये RIL कडे 16.34%, Viacom18 कडे 46.82% आणि Disney कडे 36.84% इतकी मालकी असेल.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, या नवीन करारामुळे भारतीय मनोरंजन उद्योगात एका नव्या युगाची सुरुवात होणार आहे. जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट माध्यम समूह म्हणून आम्ही डिस्नेचा नेहमीच आदर केला आहे.

अंबानी पुढे म्हणाले की, दोन कंपन्यांच्या धोरणात्मक उपक्रम राबवण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. देशभरातील प्रेक्षकांना परवडणाऱ्या दरामध्ये सेवा देण्यासाठी या जॉईंट व्हेंचरचा उपयोग होईल. त्यामुळे रिलायन्स समूहाचा प्रमुख भागीदार म्हणून आम्ही डिस्नेचे स्वागत करतो.

दोन कंपन्यांच्या करारानंतर वॉल्ट डिस्नेचे सीईओ बॉब इगर म्हणाले, रिलायन्सला भारतीय बाजारपेठ आणि ग्राहकांची सखोल माहिती आहे. त्यामुळे आम्ही एकत्रितपणे काम करुन नवीन कंपनीला देशातील आघाडीच्या मीडिया कंपन्यांपैकी एक बनवू. त्या माध्यमतून ग्राहकांना डिजिटल सेवा आणि मनोरंजनाचा सक्षम पर्याय निर्माण होईल.