Covishield बनवणाऱ्या कंपनीने मान्य केले लसीचे दुष्परिणाम

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 17 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

जगाभरात कोरोनाने धुमाकूळ घातला होते. त्यावर लस बनवण्यात आली. जगभरातील लोकांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस घेतली. भारतातही कोट्यवधी लोकांनी कोरोनाच्या लसीचे दोन डोस देण्यात आले होते. या दरम्यान, कोरोना लसीची आणि त्याच्यापासून होणाऱ्या दुष्परिणामाची सर्वत्र मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू होती, मात्र आता ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेकाने कोरोना लसीबाबत स्वत:च कबुली आहे.

लस तयार करणाऱ्या एस्ट्राजेनेका कंपनीने युनायटेड किंग्डमच्या उच्च न्याालयामध्ये काही कागदपत्रे दिली असून, त्यामधून या कंपनीने त्यांच्या कोविड-१९ लसीमधून टीटीएससारखा दुर्मीळ आजार होऊ शकतो, असा दावा केला आहे. एस्ट्राजेनेका लसीची अनेक देशांमध्ये कोविशिल्ड आणि वॅक्सजेवरिया या नावांनी विक्री करण्यात आली आहे.

कोरोनाचे औषध बनवणारी ब्रिटिश फार्मास्युटिकल कंपनी AstraZeneca ने आपल्या कोविड-१९ लसीमुळे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात हे पहिल्यांदाच मान्य केलं आहे. AstraZeneca ने UK मधील उच्च न्यायालयात याची कबूली दिली आहे. कोविड-१९ लसीमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम (TTS) सारखे दुष्परिणाम होऊ शकतात, असं कंपनीने म्हटलं आहे.

थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोममुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ लागतात किंवा शरीरात प्लेटलेट्स झपाट्याने कमी होऊ लागतात. शरीरात रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे ब्रेन स्ट्रोक किंवा कार्डियाक अरेस्ट होण्याची शक्यता वाढते. AstraZeneca ने या वर्षी फेब्रुवारीमध्ये यूके उच्च न्यायालयासमोर लसीच्या दुष्परिणामांचे आरोप स्वीकारले आहेत. पण कंपनीने लसीच्या बाजूने आपले युक्तिवादही मांडले आहे. कंपनी जगभरात ही लस Covishield आणि Vaxjaveria या नावाने विकली जाते.

AstraZeneca यूके उच्च न्यायालयासमोर काय म्हणाले?
जेमी स्कॉट नावाच्या ब्रिटीश व्यक्तीने ॲस्ट्राझेनेकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोरोना लसीमुळे तो थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमच्या समस्येने ग्रस्त आहे. तो ब्रेन डॅमेजचा बळी ठरला होता.

कंपनीच्या कोरोना लसीविरोधात १२ पेक्षा अधिक लोकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. या लोकांनी आरोप केले आहेत की, लस घेतल्यानंतर त्यांना दुष्परिणामांचा सामना करावा लागला. या लोकांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. अशा परिस्थितीत ॲस्ट्राझेनेका या लसीच्या दुष्परिणामांबाबत न्यायालयात काय म्हणाले? हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे:-

१) AstraZeneca ने कोर्टासमोर दाखल केलेल्या कायदेशीर कागदपत्रात म्हटले आहे की, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने विकसित केलेल्या कोरोना लसीचे दुष्परिणाम होऊ शकतात. हे दुष्परिणाम थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमसारखे असू शकतात. पण हे फार दुर्मिळ आहेत.

२) ॲस्ट्राझेनेका यांनी न्यायालयाला सांगितले की, पण कोरोनाची लस न मिळाल्यासही थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम होऊ शकतो हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत, लस घेतल्यानंतर लोक या सिंड्रोम होतो असे म्हणणे योग्य नाही.

३) कंपनीचे म्हणणे आहे की, अनेक स्वतंत्र अभ्यासांमध्ये ही लस कोरोनाचा सामना करण्यासाठी खूप प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत, कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी या अभ्यासांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

४) कंपनीचा असा विश्वास आहे की, लसीचे दुष्परिणाम अत्यंत दुर्मिळ आहेत. कंपनीने सांगितले की, रुग्णांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आमच्या औषधांनी योग्य मानकांची पूर्तता केली आहे आणि आम्ही लसींसह सर्व औषधांचा सुरक्षित वापर सुनिश्चित केला आहे.

५) कंपनीने न्यायालयासमोर सांगितले की AstraZeneca-Oxford लसीच्या क्लिनिकल चाचण्या आणि जगभरातील तिची स्वीकृती दर्शवते की मोठ्या प्रमाणात लसीकरण कार्यक्रमाचा फायदा झाला आहे, ज्यामुळे लसीच्या संभाव्य दुष्परिणामांचा धोका कमी होतो.

६) कंपनीचे म्हणणे आहे की, कोविड-१९ महामारीच्या काळात लसीच्या मदतीने जगभरात 60 लाख लोकांचे प्राण वाचवले गेले आहेत.

७) AstraZeneca लस मिळाल्यानंतर विविध प्रकारच्या समस्यांचा दावा करणाऱ्या लोकांच्या स्थितीबद्दल त्यांना काळजी वाटते. परंतु आम्ही अजूनही आमच्या दाव्यावर ठाम आहोत की त्याचे दुष्परिणाम अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्येच होऊ शकतात.

AstraZeneca ने भारतातील पुणे येथील Serum Institute of India (SII) च्या सहकार्याने Covishield लस विकसित केली आहे.