सोलर रूफटॉप योजनेबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय!

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 1 Months ago
सोलार रूफटॉप योजना
सोलार रूफटॉप योजना

 

रूफटॉप सोलर योजनेसाठी केंद्र सरकारने 75 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील एक कोटी कुटुंबांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या या निर्णयाची माहिती दिली आहे.

ते म्हणाले, 'पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. रूफटॉप सोलर योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे एक कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिट मोफत वीज मिळू शकणार आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला प्रति किलोवॅट प्रणाली 30 हजार रुपये अनुदान मिळणार आहे. याशिवाय 2 किलोवॅट प्रणाली अंतर्गत 60 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.  

या योजनेअंतर्गत, कोणतेही कुटुंब राष्ट्रीय पोर्टलला भेट देऊन अनुदानासाठी अर्ज करू शकते आणि छतावरील सोलर रूफटॉप योजेनसाठी कोणताही व्हेंडरला निवडू शकतात. याशिवाय त्यांना कमी व्याजावर कर्जही मिळू शकते. या योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात मॉडेल सोलर योजना बनवण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे.  

ही गावे आदर्श म्हणून तयार केली जातील रोल मॉडेल म्हणून तयार करण्यात येणार, जेणेकरून ग्रामीण भागात याबाबत जागरूकता निर्माण करता येईल. या योजनेची घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली होती. तुम्ही योजनेचा लाभ कसा घेऊ शकता? याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

1. या योजनेअंतर्गत एक कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिट मोफत वीज मिळणार आहे. यामुळे ग्राहकांची महिन्याला हजारो रुपयांची बचत होणार आहे.

2. सोलर प्लांटमधून शिल्लक राहिलेली अतिरिक्त वीज नागरिक वीज कंपन्यांना विकू शकतील आणि त्यांना यातून पैसेही मिळतील.

3. निवासी भागात सौरऊर्जा प्रकल्प उभारून 30 GW वीजही तयार केली जाईल.

4. यामुळे पुढील 25 वर्षांत कार्बन उत्सर्जन 720 मिलियन टनांनी कमी होईल.

5. ही योजना उत्पादन, लॉजिस्टिक, पुरवठा साखळी, विक्री आणि इतर सेवांमध्ये 17 लाख नोकऱ्या उपलब्ध करून देईल.