भारतीय संगीत 'शक्ती'चा गौरव

Story by  आवाज़ मराठी | Published by  [email protected] • 5 Months ago
ग्रॅमी पुरस्कार विजेते उस्ताद झाकीर हुसैन आणि गायक संगीतकार शंकर महादेवन
ग्रॅमी पुरस्कार विजेते उस्ताद झाकीर हुसैन आणि गायक संगीतकार शंकर महादेवन

 

भारतीय संगीताला महान परंपरा असून, तानसेन ते झाकीर हुसेन अशी शतकानुशतके चालत आलेल्या संगीत मैफलीची भैरवी कधीच होऊ नये, असे चाहत्यांना वाटते. संगीत विश्वात ग्रॅमीला अनन्यसाधारण महत्त्व असून, तो सन्मान मिळवणे प्रत्येक संगीतकाराचे स्वप्न असते. यंदाच्या ग्रॅमी सोहळ्यात भारतीय कलाकारांनी छाप पाडली. एकीकडे भारतीय संगीत बेसूर होत असल्याची आवई उठविली जात असताना ग्रॅमी सन्मानाने भारतीय संगीताचे पावित्र्य अधोरेखित केले आहे.

भारतीय संगीताला आपल्या अलौकिक स्वराने जागतिक पातळीवर अनोखी उंची मिळवून देणाऱ्या गानकोकिळा लता मंगेशकर यांची उद्या (ता.६) द्वितीय पुण्यतिथी असताना भारतातील तीन दिग्गजांना संगीत विश्वातील ऑस्कर समजल्या जाणारा ग्रॅमी पुरस्कार मिळणे ही एकप्रकारे लताजींना वाहिलेली अनोखी आदरांजली म्हणावी लागेल.

गायक शंकर महादेवन, तबला वादक झाकिर हुसेन आणि बासरीचादक राकेश चौरसिया यांनी ग्रॅमीवर मोहोर उमटविली आहे. दोघांचा बँड 'शक्ती'चा अल्बम 'धिस मोमेंट ने ग्रमीत धूम उडवून दिली. 'धिस मोमेंट'ला 'बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्वम' श्रेणीतील पुरस्कार मिळाला. या बँडमध्ये शंकर महादेवन, जॉन मॅकॉलॉलिन, झाकिर हुसेन, व्ही. सेल्वागणेश आणि गणेश राजगोपालन यांचा समावेश आहे. झाकिर हसेन यांना तीन ग्रॅमी पुरस्कार मिळाले. त्यांना 'पश्तो साठी 'बेस्ट ग्लोबल म्युझिकल परफॉर्मन्स'च्या श्रेणीत बासरीवादक राकेश चौरसिया यांच्यासमवेत ग्रॅमीने गौरविले आहे. तसेच 'एज वुई स्पीक' साठी 'कन्टेम्पररी इन्स्ट्रमेंट अल्बम' श्रेणीत देखील हुसेन यांनी ग्रॅमी पटकावला आहे. यापूर्वी झाकिर हुसेन यांनी १९९१ मध्ये अल्बम 'प्लानेट ड्रम्स'साठी टी. एच. विक्कू विनायकराम यांच्यासमवेत ग्रॅमी पटकावला होता. २००९ मध्येही त्यांना 'ग्लोबल ड्रम प्रोजेक्ट साठी ग्रॅमी मिळाले, दोन वर्षापूवी, २०२२ मध्ये भारताला दोन ग्रॅमी पुरस्कार मिळाले. पी.ए. दीपक, रिक्की केज आणि स्टिवर्ट कॉपलँडच्या 'डिव्हाईन टाइड्स'ला 'बेस्ट न्यू एज अल्बम' श्रेणीत सन्मान मिळाला होता.
 
भारतीय संगीताचा दबदबा
 
भारतीय संगीताचा जगभरात दबदबा आहे; त्याची प्रचिती नेहमीच येते. महान सतारवादक पंडित रविशंकर यांना आपल्या संपूर्ण कारर्किदीत दहा वेळेस प्रेमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले होते. प्रमी मिळवणारे पंडित रविशंकर हे पहिले भारतीय संगीतकार, मुंबईत जन्मलेले अकिस्ट्रा संयोजक शुबिन मेहता यांचे जगभरात चाहते आहेत. त्यांना पाच वेळा ग्रमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, त्यांना पहिल्यांदा १९८१ मध्ये प्रेमी पुरस्कार मिळाला होता. पंडित विश्वमोहन भट्ट यांनी संगीताच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव उंचावले आहे. त्यांना १९९३ मध्ये 'का मिटिंग बाय द रिव्ह' अल्बमसाठी 'बेस्ट वर्ल्ड म्युझिक अल्वम' श्रेणीत ग्रॅमी पुरस्कार मिळाला. संगीतकार ए.आर. रेहमान यांना 'स्लमडॉग मिलेनियर साठी दोन वेगवेगळ्या श्रेणीत अंभो मिळाला. गायिका फाल्गुनी शहानेदेखील २०२२ मध्ये 'ज कलरफुल वर्ल्ड'साठी चिल्ड्रन्स श्रेणीत प्रेमी पुरस्कार मिळवला होता. रविशंकर यांची कन्या अनुष्का शंकरनेही ग्रॅमी पुरस्कार पटकावला आहे. स्लोवल म्युझिक अल्बम श्रेणीत ग्रॅमी जिंकणारा भारतीय बैंड 'शक्ती ला पाच दशकांची परंपरा आहे. महाविष्णू ऑर्केस्ट्रपासून वेगळे झाल्यानंतर १९७३ मध्ये शक्ती बैड अस्तित्वात आला. या बैडमध्ये चार वर्षांपूर्वी बदल करण्यात आला. 'धिस मोमेंट' हा अल्बम २३ जून २०२३ रोजी लाँच करण्यात आला. या अल्बममध्ये आठ ट्रैक आहेत. त्यात श्रीनिज ड्रोम, बेडिंग द स्ल्स, करुणा, गिरिराज सुधा, मोहमन आणि लास पालमास यांचा समावेश आहे. 

उत्तुंग संगीत परंपरा
२०२३ मध्ये पद्मविभूषण सन्मानाने गौरविलेले तबलावादक उस्ताद झाकिर हुसेन यांनी ग्रॅमी पटकावून भारतीय संगीतकलेच्या सन्मानात भर घातली आहे. उस्ताद झाकिर हुसेन एका वर्षात सुमारे १५० ते २०० शो करतात आणि तेही जगाच्या कानाकोपऱ्यात. १९५१ मध्ये मुंबईत जन्मलेले झाकिर हुसेन पयांच्या डीएनएमध्येच तबल्याचे गुण होते. झाकिर हुसेन यांनी त्यांच्या वडिलांकडेच तबल्याचे धडे गिरवले. वडिलांवर नितांत प्रेम करणारे झाकिर हे जोपर्यंत वडील घरी येत नसत तोपर्यंत जागे राहत असत. १९६७ मध्ये जन्मलेले शंकर महादेवन यांनी वयाच्चस पाचव्या वर्षापासून संगीत शिकण्यास सुरवात केली होती. महादेवन हे हिंदीबरोबरच तमीळ, तेलुगू, मराठी, कनड चित्रपटांत आवाज दिला आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअर झाल्यानंतरही शंकर महादेवन यांचे संगीतप्रेम कमी झाले नाही.
 
१९९८ मध्ये शंकर यांचा पहिला अल्बम 'ब्रेथलेस' हा त्यांच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉईंट ठरला, या आत्वमला लोकांनी पसंती दिली. त्यांनी एहसान आणि लॉय यांच्यासमवेत पार्श्वसंगीत देणारी तिकड़ी' आणली आणि त्यांच्या संगीताचा सुहाना सफर सुरू झाला, राकेश चौरसिया हे प्रसिद्ध बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया यांचे पुतणे. आपल्याला सामान्य ज्ञानाच्या पुस्तकात एक प्रश्न नेहमोच विचारला जातो, हरिप्रसाद चौरसिया हे कशासाठी प्रसिद्ध आहेत? त्यासाठी चार पर्याय असायचे, मात्र अचूक पर्याय असायचा बासरीवादन. हरिप्रसाद चौरसिया यांच्याशी असणारे त्यांचे नाते इतके भिनले की, राकेश चौरसिया हे काकांच्या पावलावर पाऊल टाकत आहेत. त्यांनी एकल बासरी वादक म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली, गझल, जैन अन्य संगीत प्रकारात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. बॉलिवूडचे संजय लोला भन्साळी, इस्माईल दरबार यांच्यासमवेत ते काम करू लागले, त्यांना नावांसमोर पंडित लावलेले आवडत नाही. गुरूंची पाठीवरची थाप मिळण्यासारखा दुसरा मोठा सन्मान नाही, असे ते म्हणतात. आता त्यांना संगीत विश्वातील सर्वात मोठा पुरस्कार मिळाला आहे.
 
लेखक: - अरविंद रेणापूरकर