जवाहरलाल नेहरू विद्यापीठच्या सेंटर ऑफ अरब अँड आफ्रिकन स्टडीज या संस्थेने "मॉडर्न सौदी लिटरेचर: क्रिएशन अँड क्रिटिसिझम" (आधुनिक सौदी साहित्य: निर्मिती आणि टीका) या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. ७ आणि ८ मे रोजी ही परिषद पार पडणार आहे.
या परिषदेचे आयोजन आणि व्यवस्थापन आवाज द व्हाईस मार्फत करण्यात आले आहे.सौदी अरेबियातील समकालीन साहित्यिक विश्वावर प्रकाश टाकणे हा या परिषदेचा प्रमुख उद्देश आहे.
“सेंटर ऑफ अरब अँड आफ्रिकन स्टडीज दरवर्षी एका विशिष्ट विषयावर अशा प्रकारच्या परिषदा आयोजित करते. या परिषदेत संशोधक आणि लेखक मोठ्या संख्येने सहभागी होतात. यासोबतच भारतासह जगभरातील शिक्षणतज्ज्ञही सहभागी होतात. ही परिषद मुख्यत्वे शोधनिबंध सादर करणे आणि साहित्यिक देवाणघेवाणीला चालना देण्यासाठीचे एक व्यासपीठ म्हणून कार्यरत आहे.” अशी माहिती परिषदेचे संचालक प्रा.रिझवान-उर-रहमान यांनी दिली.
विशेष म्हणजे म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोग केयरने सूचीबद्ध केलेल्या अलजील अलजादीद या प्रतिष्ठित जर्नलमध्ये हे महत्त्वाचे शोधनिबंध प्रकाशित होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, या आंतरराष्ट्रीय परिषदेची थीम ‘आधुनिक सौदी साहित्य’ अशी आहे. सौदी स्त्री-पुरुष स्त्री लेखकांची संख्या लक्षणीय आहे, त्यांच्या साहित्यकृतींना खूप महत्त्व आहे. तरीही सौदी लेखक आणि त्यांच्या आधुनिक साहित्यकृतींकडे भारतीय साहित्य वर्तुळात फारसे लक्ष दिले जात नसल्याने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.
परिषदेची उद्दिष्ट्ये
. सौदी लेखकांचे साहित्य, त्यांची शैली, दृष्टीकोन आणि योगदान यांचा परिचय करून देणे
. आधुनिक सौदी साहित्यातून मांडण्यात आलेल्या
. सौदी लेखक त्यांच्या साहित्यकृतींमध्ये हाताळलेले विषय आणि थीम यांच्यावर लक्ष केंद्रित करून त्यांचे विश्लेषण करणे.
. आधुनिक सौदी साहित्यातील ताज्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे
अरबी भाषा आणि साहित्य यांचे रसिक आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी यांच्यामध्ये अकादमीक आणि शास्त्रीय अनुभवांची देवाणघेवाण घडवून आणणे. अलीकडच्या काही दशकांमध्ये आधुनिक सौदी साहित्यात प्रचंड प्रगती झाली आहे. अनेक साहित्यकृती समीक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत, तर अनेकांना महत्त्वाचे साहित्यिक पुरस्कारही मिळाले आहेत," असे संमेलनाचे समन्वयक डॉ. झार नगर यांनी सांगितले.
सौदीतील साहित्यिक तत्त्वे आणि विविध देशांतील अभ्यासक यांच्यात संवाद घडवून आणणे हा ‘या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचा उद्देशआहे. अनेक अरब राष्ट्रांची उपस्थिती या संमेलनाची शोभा वाढवणार आहेत.. परिषदेतील चर्चा आणि सूचना महत्वाच्या ठरणार आहेत. त्यातूनच या परिषदेचे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत मिळणार आहे.
दोन दिवसीय कार्यक्रमात, आठ सत्रांमध्ये, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, ओमान, बहरीन, कतार, कुवेत, अल्जेरिया, मोरोक्को, ट्युनिशिया, येमेन आणि पॅलेस्टाईनसह विविध अरब देशांतील सहभागी सुमारे पन्नास शैक्षणिक शोधनिबंध करतील.सोबतच इराक, सीरिया, लिबिया आणि सुदान आणि भारतातील विविध विद्यापीठांतील अनेक संशोधक आपला सहभाग नोंदवणार आहेत.
या परिषदेत खालील विषयांवर शोधानिबंध सादर केले जाणार आहेत
. आधुनिक सौदी साहित्यातील साहित्य आणि राष्ट्रीय ओळख
. राष्ट्रीय, सामाजिक आणि राजकीय समस्या
. सौदी साहित्याच्या प्रकाशनावर माध्यम आणि तंत्रज्ञान यांचा प्रभाव.
. सौदी साहित्यातील महिला प्रश्नांची हाताळणी
. बाल पत्रकारिता आणि साहित्य.
या परिषदेची थीम सौदी अरेबियाशी संबंधित असल्याने अनेक शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधकांनी यांचे स्वागत केले आणि ते यात उत्साहाने सहभागीही होणार आहेत.