पोस्ट ऑफिसच्या 'या' स्कीममध्ये 5 वर्षात 5 लाखाचे होणार 7 लाख

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 1 Years ago
गुंतवणुकीची मर्यादा नाही; उघडू शकता एकापेक्षा जास्त खाती
गुंतवणुकीची मर्यादा नाही; उघडू शकता एकापेक्षा जास्त खाती

 

पोस्ट ऑफिस स्कीम्समध्ये गुंतवणूक कायमच सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय आहे. यात फिक्स्ड डिपॉझिट किंवा नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये (NSC) गुंतवणूकीचा चांगला पर्याय आहे. या स्कीम्समध्ये मॅच्युरिटीवर चांगल्या व्याजासह मजबूत परतावा मिळतो.

या स्कीममध्ये गुंतवणुकीची मर्यादा नाही. तुम्ही एकापेक्षा जास्त खाती उघडू शकता. 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सूट मिळते. 5 लाखांच्या गुंतवणुकीवर 2 लाखांचा परतावा आहे. पोस्ट ऑफिस एनएसईमध्ये 7% व्याज मिळते. व्याजावर चक्रवाढ लागू आहे.

नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट (NSC) म्हणजे काय ?
ही केंद्र सरकारची एक अल्पबचत योजना (Small savings scheme) आहे. यात तुम्ही 5 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. मॅच्युरिटीवर, एकूण ठेव आणि व्याजाची रक्कम एकत्र दिली जाते. पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये गुंतवणुकीचे काही नियम आहेत. जर तुम्ही 1000 रुपये ठेवले तर 5 वर्षांनी तुमच्याकडे 1403 रुपये होतील. म्हणजे 403 रुपये परतावा मिळतो.

तुम्ही या योजनेत 5 वर्षांसाठी 5 लाख रुपये जमा केल्यास, तुम्हाला मॅच्युरिटीवर पूर्ण 7 लाख मिळतील. या स्कीममध्ये 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू होते. यामध्ये तुम्हाला 5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 2,01,276 रुपयांपर्यंत व्याज मिळते. ही स्कीम कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये सुरू करता येते.

10 वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती पोस्ट ऑफिसच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये गुंतवणूक करू शकते. 10 वर्षांखालील मुलाचे अकाउंट त्याचे पालक उघडू शकतात. योजनेची मॅच्युरिटी 5 वर्ष आहे, त्यामुळे 5 वर्षापूर्वी पैसे काढता येत नाहीत. गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. खाते उघडल्यानंतर कुटुंबातील कोणालाही योजनेतनॉमिनी ठेवता येऊ शकते. डिपॉझिटवर 1.5 लाखांपर्यंत कर सवलत मिळते.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.