प्रो कबड्डी : अस्लम इनामदारच्या खेळाची सर्वत्र चर्चा

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 1 Months ago
अस्लम इनामदार
अस्लम इनामदार

 

प्रो कबड्डी स्पर्धेत यंदा कमालीची प्रगती करत गटसाखळीत अव्वल स्थान मिळवलेल्या पुणेरी पटलण संघाचा उद्या माजी विजेत्या पाटणाविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना होत आहे; तर दुसऱ्या सामन्यात जयपूरची लढत हरियानाविरुद्ध होणार आहे.

पुणे संघाने यंदा २२ साखळी सामन्यात १७ विजय मिळवले. त्यात अस्लमचा चढाईचा खेळ आणि त्याचे नेतृत्व प्रभावी ठरले आहे. २१ सामन्यांतून ११२ गुणांची कमाई करणाऱ्या अस्लमवर पुणे संघाची मोठी मदार असणार आहे.
 
नगरमधील छोट्याशा गावात जन्मलेल्या अस्लमने २०१० मध्ये शालेय कबड्डीतून प्रगती केले. पुढे जाऊन तो भारतीय संघातीलही महत्त्वाचा खेळाडू ठरला.
 
२०११ मध्ये वडिलांचे छत्र गमावलेल्या अस्लमने कबड्डीचा ध्यास सोडला नाही. शाळा संपल्यानंतर चहा विकून त्याने कुटुंबाला मदत केली आणि स्वतः ही कबड्डीचा ध्यास सोडला नाही. पुणे संघाने प्रो कबड्डीचे विजेतेपद मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत. गतवर्षी जयपूर संघाकडून त्यांचा अंतिम सामन्यात निसटता पराभव झाला होता. यंदा विजेतेपदाचे स्वप्न पूर्ण करायचे आहे, असे अस्लमने सांगितले.
 
गतविजेत्या जयपूरचे पारडे जड असले तरी त्यांना हरियानाविरुद्ध सावध रहावे लागणार आहे. जयपूरकडून अर्जुन देसवाल कमालीचा फॉर्मात आहे. त्याला व्ही. अजित कुमार आणि इराणच्या अमीरहोसेन मोहम्मद चांगली साथ मिळत आहे. हरियानाने उपांत्य सामन्यात गुजरातवर मोठा विजय मिळवलेला असल्यामुळे त्यांचाही आत्मविश्वास वाढलेला आहे. हरियानाचे राहुल सतपाल मोहित नंदलाल हे बचाव खेळाडू अर्जुनला कसे रोखतात, हे महत्वाचे ठरणार आहे.