फहाद फाजील करतोय 'या' आजाराचा सामना

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 1 Months ago
फहाद फाजील
फहाद फाजील

 

मल्याळम सिनेमाचा सुपरस्टार फहाद फाजील सध्या 'आवेशम' या त्याच्या गाजलेल्या सिनेमाच्या सेलिब्रेशनमध्ये बिझी आहे. यानंतर लवकरच रिलीज होणाऱ्या 'पुष्पा २' या सिनेमात फहाद खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'आवेशम' मधील फहादच्या अॅक्शनची चर्चा खूप होतेय. फिल्ममध्ये त्यांनी एका स्थानिक गुंडांची भूमिका साकारली आहे.

एका इव्हेंट दरम्यान फहादने खुलासा केला कि, ADHD म्हणजेच अटेंशन डेफिसिट हायपरअॅक्टिविटी डिसऑर्डरचा सामना करत आहे.

फहाद फाजील कोठामंगलममधील एका शाळेत समारंभ फहाद फाज‍िल कोठामंगलम येथे आयोजित केलेल्या समारंभात हजेरी लावली. तेव्हा त्याने तिथे खुलासा केला कि, ४१ व्या वर्षांपासून अटेंशन डेफिसिट हायपरअॅक्टिविटी डिसऑर्डरचा (ADHD) चा सामना करत आहेत. फहादने ज्या ठिकाणी हजेरी लावलेली ती अपंग मुलांची शाळा आहे.

अभिनेता म्हणाला कि, "शाळेच्या मैदानाला फेरी मारताना मी विचारलं कि, एडीएचडीवरील उपचार सोपा आहे का? त्यावर मला उत्तर मिळालं कि, लहानपणी याच निदान झालं तर उपचार शक्य आहेत. मग मी विचारलं कि, मला ४१ व्या वर्षी निदान झालंय कारण मला आता त्याचं निदान झाल्याचं डॉक्टरनी सांगितलं आहे. जर तुम्ही माझ्याकडे पाहून हसू शकता तर ती एकमेव गोष्ट आहे जी मी करू शकतो."

काय आहे ADHD?
ADHD ज्याला अटेंशन डेफिसिट हायपरअॅक्टिविटी डिसऑर्डर ओळखलं असून हा साधारणतः लहानपणी मुलांमध्ये पाहायला मिळतो. कधीकधी हा एखाद्या मोठ्या माणसाला होऊ शकतो.

या आजारात मन अधिक सक्रिय होतं त्यामुळे व्यक्ती हायपर अॅक्टिव्ह होते आणि कोणत्याही गोष्टीवर ते लक्ष केंद्रित करू शकत नाही. लगेच लक्ष विचलित होतं. या जोरावर उपचार करण्यासाठी बिहेवियर थेरपीचा वापर केला जातो. याशिवार डॉक्टर्स औषध आणि समुपदेशनाचा वापरही केला जातो.