शाहबानो खटल्यावर बनणार चित्रपट

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 5 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

देशातील लँड मार्क केसेसमध्ये ज्या केसचा नेहमीच दाखला दिला जातो त्या शाहबानो बेगम विरुद्ध मोहम्मद अहमद खान प्रकरणानं देशाचे लक्ष वेधून घेतले होते. आता त्या खटल्यावर चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. द फॅमिली मॅन आणि द ट्रायल सारख्या प्रसिद्ध मालिकांचे लेखक आणि दिग्दर्शक सुपर्ण एस वर्मा हे त्याचे दिग्दर्शन करणार आहेत.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वर्मा हे आता शाहबानो बेगम प्रकरणावर आधारित संशोधन प्रक्रियेत व्यस्त आहेत. वर्मा यांच्याविषयी सांगायचे झाल्यास त्यांच्या द फॅमिली मॅन, राणा नायडू, द ट्रायल आणि सुल्तान ऑफ डेल्ही सारख्या मालिका लोकप्रिय झाल्या होत्या. त्याची खूप सारी चर्चाही झाली. त्यामुळे ते चर्चेत आले होते. याशिवाय सिर्फ एक बंदा काफी है चित्रपटानं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

शाहबानो बेगम विरुद्ध मोहम्मद अहमद खान हा खटला शाहबानो बेगमच्या नावानं ओळखला जातो. भारतातील ऐतिहासिक खटल्यांपैकी एक म्हणून त्याकडे पाहिले गेले आहे. मोहम्मद अहमद खान विरुद्ध शाह बानो बेगम १९८५ सालचा तो खटला होता. त्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पीडित घटस्फोटित मुस्लिम महिलेला तिच्या पाच मुलांसाठी पोटगी देण्यात यावी. असे म्हटले होते.

मध्य प्रदेशमधील शाह बानो बेगम यानं १९७८ मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर शाहबानोनं सर्वोच्च न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला, ज्यामध्ये तिने तिच्या पतीकडून पोटगीची मागणी केली होती. मोठ्या लढ्यानंतर आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर तिनं हा खटला जिंकला होता. आता या खटल्यावर चित्रपट येणार असल्याचे कळताच चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

वर्मा यांच्या या प्रोजेक्टमध्ये कोणता सेलिब्रेटी प्रमुख भूमिकेत दिसणार याविषयी अद्याप कोणती माहिती अधिकृतपणे समोर आलेली नाही. मात्र या विषयावरील चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे असे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.