संजय भन्साळी यांच्या हिरामंडीमध्ये असंख्य घोडचुका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 11 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

सध्या प्रेक्षकांमध्ये, संजय लीला भन्साली यांच्या ‘हीरामंडी : द डायमंड बझार’ वेब सीरिजची जोरदार चर्चा सुरू आहे. ही वेब सीरिज १ मे रोजी ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रिम झालेली आहे. सध्या प्रेक्षकांकडून वेबसीरीजला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अशातच या वेबसीरीजमध्ये काही चुका आढळलेल्या आहेत. यामुळे नेटकऱ्यांनी दिग्दर्शकांना तुफान ट्रोल केले आहे.

कायमच संजय लीला भन्साली आपल्या कामामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. त्यांचा चित्रपट येणार म्हटल्यावर चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. भन्साळी यांच्या ‘हीरामंडी : द डायमंड बझार’ वेबसीरीजमध्ये काही चुका आढळलेल्या आहेत. या वेबसीरीजचे कथानक स्वांतत्र्यपूर्व काळातील पाकिस्तानातील आहे. कदाचित दिग्दर्शकांना वेळेचं अनुमान लावायला जमलं नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्यांना नेटकरी ट्रोल करीत आहे.

सोनाक्षी सिन्हाने वेबसीरीजमध्ये, फरदीन नावाचं पात्र साकारलं आहे. एका सीनमध्ये, सोनाक्षी सिन्हाच्या हातात उर्दू वृत्तपत्र पाहायला मिळत आहे. त्या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर कोरोना व्हायरस संबंधित बातमीची हेडिंग दिसत आहे. उर्दू वाचक प्रेक्षकांनी भन्साळींचीही चुक एका झटक्यात पकडली आहे. त्यासोबतच काहींनी कलाकारांच्या उर्दू डायलॉग्सवरही नाराजी व्यक्त केलेली आहे. फरीदा जलाल यांना सोडलं तर इतर कोणत्याही कलाकाराला उर्दू व्यवस्थित बोलायला जमलेलं नाही.

तर आणखी एक या वेबसीरीजमध्ये आहे, ती म्हणजे, आदिती लायब्ररीमध्ये जाते. तिथे २००४ मध्ये प्रकाशित झालेलं पीर-ए-कामिल हे पुस्तक दिसलं. त्यामुळेही नेटकऱ्यांनी भन्साळींना ट्रोल केलेलं आहे. अशा आणखी अनेक चुका आहेत ज्यांचा विचार दिग्दर्शकांनी केलेला दिसत नाही. वेश्या महिलांवर आधारित या वेबसीरीजमध्ये प्रमुख भूमिकेत मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, आदिती राव हैदरी, शरमिन सहगल, रिचा चड्डा आणि संजीदा शेख आहे. जरीही नेटकरी वेबसीरीजला चुकांमुळे ट्रोल करत असले तरीही वेबसीरीजची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.