एअर इंडिया एक्स्प्रेसने 'यामुळे' केली मोठी कारवाई

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 11 d ago
एअर इंडिया एक्स्प्रेस
एअर इंडिया एक्स्प्रेस

 

एअर इंडिया एक्सप्रेस एअरलाइन्सने सामूहिक रजेवर गेलेल्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे. रजेवर गेलेल्या 25 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. एअरलाइन्सशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, ज्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे त्या कर्मचाऱ्यांनी तक्रार केली नाही आणि त्यांचे वर्तनही चांगले नव्हते.

मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा घेतल्याने एअर इंडिया एक्सप्रेसची अनेक उड्डाणे रद्द करावी लागली होती. त्यामुळे विमान प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. कर्मचाऱ्यांसोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान कंपनी लवकरच एक निवेदन जारी करेल.

एअर इंडिया एक्सप्रेसने सर्व कर्मचाऱ्यांना पत्र लिहिले आहे. तुम्हाला तुमच्या समस्येवर खुलेपणाने चर्चा करण्यास सांगितले आहे. सामूहिक रजेवर पुनर्विचार करावा. कंपनी आणि प्रवाशांच्या बाजूने निर्णय घ्यावा. प्रशासन प्रत्येक स्तरावर चर्चेसाठी तयार आहे. असे कंपनीने कर्मचाऱ्यांना सांगितले आहे.

300हून अधिक क्रू मेंबर्स अचानक आजारी रजेवर गेल्यामुळे एअर इंडिया एक्सप्रेसच्या उड्डाणांवर आणखी काही दिवस परिणाम होऊ शकतो. एअर इंडिया एक्स्प्रेसचे सीईओ आलोक सिंह यांनी सांगितले की, एअरलाईनला उड्डाणे कमी करण्यास भाग पाडले आहे. मात्र, कर्मचाऱ्यांशी त्यांच्या प्रश्नांवर बोलण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एअर इंडिया एक्सप्रेसकडून मागवला अहवाल
नागरी उड्डाण मंत्रालयाने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत एअर इंडिया एक्सप्रेसकडून अहवाल मागवला आहे. मंगळवारी सायंकाळपासून क्रू मेंबर्स आजारी रजेवर गेल्याने एअर इंडिया एक्स्प्रेसच्या 90 फ्लाइट्सवर परिणाम झाला असून त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कर्मचारी अचानक रजेवर का गेले?
कंपनीने आपल्या ताज्या निवेदनात स्पष्ट केले आहे की क्रू मेंबर्सच्या अचानक आजारपणामुळे फ्लाइट्समध्ये आणखी कपात केली जाईल. एअरलाइन्सचे सीईओ आलोक सिंह यांनी एक निवेदन जारी करून संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली आहे.

ते म्हणाले की, मंगळवारी संध्याकाळपासून, आमच्या 100 हून अधिक केबिन क्रू सहकाऱ्यांनी त्यांच्या फ्लाइट ड्युटीच्या शेवटच्या क्षणी आजारी असल्याची तक्रार नोंदवली आहे. यामुळे आमच्या कामात अडथळे निर्माण झाले आहेत.