भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आणखी एक विजय

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 10 d ago
इराणने भारतीय खलाशांची सुटका केली
इराणने भारतीय खलाशांची सुटका केली

 

इराणने जप्त केलेल्या इस्रायलीशी संबंधित जहाजावरील पाच भारतीय खलाशांना नुकतेच सोडण्यात आल्याचे इराणमधील भारतीय दूतावासाने सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, खलाशांनी गुरुवारी संध्याकाळी इराण सोडला.

या सुटकेचा तपशील देताना, भारतीय दूतावासाने इराणी अधिकाऱ्यांचे बंदर अब्बासमधील दूतावास आणि भारतीय वाणिज्य दूतावास यांच्याशी समन्वय साधल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

"MSC Aries जहाजावरील भारतीय खलाशींपैकी 5 जणांची सुटका करण्यात आली आहे आणि आज संध्याकाळी ते इराणहून निघाले आहेत. दूतावास आणि बंदर अब्बासमधील भारतीय वाणिज्य दूतावास यांच्याशी समन्वय साधल्याबद्दल आम्ही इराणी अधिकाऱ्यांचे आभार मानतो," असे इराणमधील भारतीय दूतावासाने केलेल्या एका एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.

इस्रायलशी संबंधित मालवाहू जहाज इराणने १३ एप्रिल रोजी जप्त केले होते, त्यात १७ भारतीय नागरिक होते.

इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स नेव्हीने मालवाहू जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ ताब्यात घेतले होते.

तत्पूर्वी, इराणने जप्त केलेल्या इस्रायलशी संबंधित मालवाहू जहाज 'MSC Aries' च्या १७ भारतीय क्रू सदस्यांपैकी एक असलेल्या केरळमधील त्रिशूर येथील ॲन टेसा जोसेफ, १८ एप्रिल रोजी सुरक्षितपणे मायदेशी परतली होती.

भारतातील इराणचे राजदूत इराज इलाही यांनी म्हटले आहे की, एमएससी एरिसमधील भारतीय नागरिक असलेल्या क्रू मेंबर्सना सोडण्यात आले असून ते मायदेशी जाण्यास मोकळे आहेत.

मालवाहू जहाज जप्त केल्याच्या पार्श्वभूमीवर, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांचे इराणी समकक्ष होसेन अमीर-अब्दोल्लाहियान यांच्याशी बोलून 17 भारतीय क्रू सदस्यांची सुटका केली.