पतंजलीच्या १४ औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 20 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

सुप्रीम कोर्टानं फटकारल्यानंतर आता बाबा रामदेव यांच्या पतंजली दिव्य फार्मसी कंपनीला उत्तराखंड सरकारनं देखील मोठा झटका दिला आहे. उत्तराखंडच्या औषध नियंत्रण विभागानं कंपनीच्या १४ औषधांवर बंदी घातली आहे. पतंजलीनं दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्यानं या औषधांवर बंदी घालण्यात आली आहे. 

कुठल्या औषधांवर बंदी
पतंजली दिव्य फार्मसीच्या ज्या औषधांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामध्ये श्वासारि गोल्ड, श्वासारि वटी, दिव्य ब्रोंकोम, श्वासारि प्रवाही, श्वासारि अवलेह, मुक्ता वटी एक्स्ट्रा पावर, लिपिडोम, बीपी ग्रिट, मधुग्रिट, मधुनाशिनी वटी एक्स्ट्रा पावर, लिवामृत एडव्हान्स, लिवोग्रिट, आईग्रिट गोल्ड आणि पतंजली दृष्टी आय ड्रॉप या औषधांचा समावेश आहे. 
 
सुप्रीम कोर्टानं फटकारलं
सुप्रीम कोर्टानं नुकतंच पतंजलीचे मालक बाब रामदेव यांना फटकारलं होतं. रामदेव यांच्याकडून दिशाभूल करणाऱ्या औषधांच्या जाहिरातील केल्या जात असल्याचं सांगत कोर्टानं नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आरवी अशोकन यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. 

कोविडच्या काळात रामदेव यांनी अॅलोपॅथी उपचार पद्धतीवर बेछुट आरोप केले होते. आधुनिक मेडिकल सायन्स हे मूर्ख विज्ञान आहे, असं विधान करुन रामदेव यांनी आधुनिक मेडिकल सायन्सची बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला होता.