समाज
MUMBAI GANAPATI VISARJAN: मुस्लीमांनी केली गणेशभक्तांची खिदमत
मुहम्मद ओवैस, मीरा रोड,मुंबई:
मुंबई आणि उपनगरांतील गणेशोत्सव म्हणजे एक अभूतपूर्व सोहळा! बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत अवघी मुंबई जणू एका वेगळ्याच भक्तीरसात आणि उत्साहात बुडालेली असते. अनंत चतुर्दशी आणि इतर विसर्जनाच्या दिवशी रस्त्यांवर भक्तांचा अथांग सागर उसळलेला असतो. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि 'गणपती बाप्पा म...