नवी दिल्ली
प्रसिद्ध चित्रपटनिर्माते अनुराग कश्यप आणि वासन बाला हे एकत्र येत चंदन रॉय स्टारर 'आख्री राइड' या नवीन चित्रपटाचे सादरीकरण करणार आहेत. हा चित्रपट येत्या ३१ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या घोषणेमुळे सिनेसृष्टीत उत्सुकता निर्माण झाली आहे.
विजेश राजन आणि यशोदा पार्थसारथी या नवोदित जोडीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून यात चंदन रॉय याच्यासह आमिर दलवी आणि फैसल मलिक यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट एका मुंबईतील राईड-शेअर चालकाच्या एका रात्रीच्या थरारक आणि तणावपूर्ण प्रवासावर आधारित आहे, जिथे त्याला एका टोकाच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो.
दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी या प्रकल्पाबाबत बोलताना सांगितले की, विजेश आणि यशोदा हे अतिशय प्रतिभावान कथाकार आहेत आणि त्यांच्या पहिल्या दिग्दर्शकीय प्रयत्नाला पाठिंबा देणे हा एक सोपा निर्णय होता. तर वासन बाला यांनीही या चित्रपटाच्या टीमसोबत जोडल्याचा आनंद व्यक्त करत हा चित्रपट अतिशय शार्क, खुमासदार आणि प्रभावी असल्याचे म्हटले आहे. रंजन सिंग, विशेष अग्रवाल, राजन ईपीके आणि अनुराग कश्यप यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.