उन्हाळ्यात आजारांपासून सावधान !

Story by  आवाज़ मराठी | Published by  Chhaya Kavire • 2 Years ago
डिहायड्रेशन, घामोऱ्या, अन्नातून विषबाधा, टायफॉईड हे आजार वाढतायेत
डिहायड्रेशन, घामोऱ्या, अन्नातून विषबाधा, टायफॉईड हे आजार वाढतायेत

 

पोरांनो उन्हात खेळू नका... उन्हात चालतात, तोंडाला रुमाल बांधा... उन्हातील खरेदी नको गं बाई... अशा सूचना प्रत्येकाच्या घरात सध्या गृहिणीकडून, घरातील ज्येष्ठांकडून येत आहेत. उन्हाळ्यात कोणत्या आजाराला सामोरे जावे लागते, याबाबत तज्ज्ञ डॉक्टर काही उपाययोजना सुचवितात. त्याबाबत प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.

उन्हाळ्यात विशेषतः डिहायड्रेशन, घामोऱ्या, अन्नातून विषबाधा, टायफॉईड असे आजार होताना दिसतात. अनेकांना मुळव्याधीचा त्रास अधिक होतो. शरीरातील उष्णता नियंत्रणात ठेवणे ही सर्व आजारावर उपाययोजना असली, तरीही विविध आजारांबाबत काळजी घेण्याची गरज आहे.

टायफॉईड -
दूषित पाणी पिणे आणि दूषित अन्नाचे सेवन करणे, यामुळे टायफॉईड होऊ शकतो. पचनयंत्रणा आणि रक्तामध्ये बॅक्टेरिया इन्फेक्शनमुळे टायफॉईड होतो. यामध्ये ताप असतो. तसेच भूख न लागणे, बॉडी पेन, कोरडा खोकला, डोकेदुखी, थंडी लागणे, आळस हे टायफॉइडचे लक्षणे आहेत. 

उपाय -
टायफॉइडपासून वाचण्यासाठी बाहेरचे अन्न खाऊ नका.
उकळलेले पाणी प्या.
अन्न नेहमी गरम करून खा.
जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवा.
टायफॉइडपासून बचाव करण्यासाठी वॅक्सीन देखील घेतले जाते.

डिहायड्रेशन -
पाणी कमी पिल्यामुळे अनेकांना डिहायड्रेशन होते. शरीरात एक तृतीयांश भागात पाणी असते. ते घाम, लघवी अन् मलावाटे बाहेर पडते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त घाम जातो. त्यामुळे पाणी, शुगर आणि सोडीयमच्या प्रमाणामध्ये गडबड होते. डिहायड्रेशन हा आजार लवकर बरा होतो; अधिक त्रास होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

उपाय -
जास्त प्रमाणात पाणी प्या.
लिंबू पाणी, नारळ पाणी आदींचे सेवन करा.
मोठ्या प्रमाणात फळांचे सेवन करा.
केळी, टरबूज, खरबूज, पपई, संत्री आदी फळांचा आहारात समावेश करा.

फूड पॉयझनिंग -
उन्हाळ्याच्या दिवसात उष्णता आणि ह्युमिडिटीमुळे बॅक्टेरिया, व्हायरस अन् फंगस वाढतात. त्यामुळे अन्न दूषित होते. या दूषित अन्नाच्या सेवनामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकते. पोटात दुखणे, वारंवार उलटी येणे, डोकेदुखी, भूक कमी लागणे, लघवीमध्ये आग होणे आदी लक्षणे आहेत.

उपाय -
पालेभाज्या असतील किंवा फळ प्रत्येक वस्तू धुवून खायला पाहिजे.
काहीही खाण्यापूर्वी आपले हात साबणाने स्वच्छ धुवावे.
नॉनव्हेज खात असेल तर पूर्ण शिजवून खा. शिळे अन्न खाऊ नका. नेहमी ताजे, शिजविलेले अन्न खावे. बाहेरचे खाणे टाळावे