कोरोनाच्या अनुषंगाने देशभरात होणार मॉक ड्रील!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 2 Years ago
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची राज्यांतील आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक
केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची राज्यांतील आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक

 

देशामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचं संकट वाढत आहे. आज नव्याने ६ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आलेले आहेत. त्याच अनुषंगाने आता देशभरात १० आणि ११ एप्रिल रोजी मॉक ड्रील होणार आहे.

 

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी राज्यांतील आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी मॉक ड्रीलबद्दल माहिती दिली.

 

 

देशात काय स्थिती?

 

कालच्या आकडेवारीनुसार देशात एका दिवसामध्ये कोरोनाचे ५ हजार ३३६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशामध्ये आतापर्यंत संक्रमित रुग्णसंख्या ४ कोटी ४७ लाख ३९ हजार ५४ इतकी झाली आहे. मागच्या १९५ दिवसांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या वाढलेली आहे.

 

सध्या देशभरात २५ हजारांच्या पुढे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मागच्या २४ तासांमध्ये कोरोनामुळे एकट्या महाराष्ट्रात ३ जणांचा मृत्यू झालेला असून ८०३ नवीन कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. कालच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात ३ हजार ९८७ कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत.

 

या सगळ्या पार्श्वभूमीवर देशभरात १० आणि ११ एप्रिल रोजी मॉक ड्रील घेण्यात येईल. यामध्ये बेड कॅपॅसिटी, मेडिसिन, ऑक्सिजन पुरवठा याबाबत केंद्रीय आरोग्य विभाग आढावा घेणार आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी ही माहिती दिली.