नागपूरमध्ये जामठा इथं राष्ट्रीय कर्करोग संस्थेचं उद्घाटन करण्यात आलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी रुग्णालयाच्या औपचारिक उद्घाटनाची घोषणा केली. रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योगपती गौतम अदानी उपस्थित होते.
#नागपूर येथील जामठा येथे उभारण्यात आलेल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट चा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 27, 2023
डॉ.आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेच्या वतीने या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आली आहे. २५ एकरच्या विस्तीर्ण परिसरात ४७० खाटांची सुविधा… pic.twitter.com/Z8zfe7q7CQ
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनीही रुग्णालयाची संपूर्ण पाहणी केली. विदर्भाच्या परिसरात सुरू झालेले हे कॅन्सर हॉस्पिटल सुरू झाल्यास मोठ्या लोकसंख्येला फायदा होणार आहे. सरसंघचालक मोहन भागवत यावेळी बोलताना म्हणाले, "स्वप्न पाहणे आणि ते पूर्ण करणे यात खूप फरक आहे. पण निर्धार पक्का असेल तर तो पूर्ण होतो आणि टीम तयार करून काम केलं तर ते लवकर पूर्ण होईल. संघ स्वयंसेवक असं कार्य करतात तेव्हा खूप बरं वाटतं.
पाटण्यातील विमान अपघाताचा संदर्भ देत मोहन भागवत यांनी तिथं स्वयंसेवकांनी कसं काम केलं ते सांगितलं. त्याचं कौतुक झालं. आणि स्वयंसेवकांनी केलेलं काम आवडल्याच ही सांगितलं.
या प्रकल्पाच्या मागे संघ उभा असल्याचे भागवत म्हणाले. इथे गरिबांची सेवा केली जाईल. उत्कृष्ट उपचार मिळेल. संघ चांगले काम करत असून यापुढील काळातही असंच सुरू राहावं, असं ते म्हणाले.
जनतेलाही आपली जबाबदारी पार पाडावी लागेल, असं भागवत म्हणाले. उपचार स्वस्त करावे लागतील. पण ज्यांची क्षमता नाही त्यांनी मोफत उपचार करावेत पण ज्यांच्याकडे आहे त्यांनी पैसे द्यावेत आणि ज्यांना मदत करता येईल त्यांनी हात पुढे करावा. इतर पद्धतींचा वापर करून उपचाराचा खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे ते म्हणाले.
मोहन भागवत म्हणाले की, कर्करोगासारख्या आजाराशी लढण्यासाठी सर्वांनी सज्ज झाले तर विजय निश्चित आहे. शेवटी भागवत यांनी रुग्णालयाच्या उद्घाटनाची औपचारिक घोषणाही केली.