प्रत्येक वर्षी २ मे ला जागतिक अस्थमा दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे श्वास आणि फुफ्फुसांच्या आजारांबाबत समाजात जागृकता निर्माण करणे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, वर्ष २०१९ मध्ये २६३ मिलीयन लोक अस्थमाने प्रभावित झाले होते. तर जवळपास साडेचार लाख लोकांचा यामुळे मृत्यू झाला होता. तेव्हा अस्थमाच्या आजारात कोणती खबरदारी घ्यावी याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
अस्थमा म्हणजे वायुमार्गात सुजन येणे. त्यामुळे फुफ्फुसांद्वारे हवा बाहेर येण्यास मदत होते. या आजारावेळी श्वास फुलणे, घाबरल्यासारखे वाटणे, हृदयात घबरावट वाटणे यांसारख्या समस्या उद्भवतात. (Health)
अस्थमा काय असतो आणि अस्थमा अटॅक का येतो?
दमा हा एक दीर्घकालीन श्वसन रोग आहे. यामुळे फुफ्फुसातील वायुमार्गांना सूज येऊ शकते, ज्यामुळे हवा आत आणि बाहेर जाणे कठीण होऊ शकते. जेव्हा ही लक्षणे वाढतात तेव्हा दम्याचा झटका येतो, ज्यामुळे श्वास घेणे खूप कठीण होते.
अटॅक येताच लगेच ही कामं करा
Step 1 - सरळ बसा आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा. झोपू नका.
Step 2 - दर 30 ते 60 सेकंदाला रिलीव्हर किंवा रेस्क्यू इनहेलरचा एक पफ घ्या, कमाल 10 पफपर्यंत.
Step 3 - 10 पफ नंतर लक्षणे खराब झाल्यास किंवा सुधारत नसल्यास, अपत्कालीन वैद्यकीय मदत घ्या.
Step 4 - मदत येण्यासाठी 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागल्यास, पायरी 2 पुन्हा करा. (Asthma)
अस्थमा अटॅकची लक्षणं
खोकला, गरगरणे आणि छातीत घट्टपणा जाणवणे ही दम्याची लक्षणे आहेत. कधीकधी लक्षणे देखील खराब होऊ शकतात. काही वेळा काही लक्षणं ही हाताबाहेरही जाऊ शकते. तर काही वेळी लक्षणं ही लक्षात येण्यासारखीच नसते. तेव्हा अचानक अस्थमा अटॅक आल्यास वरील स्टेप्स नक्की फॉलो कराव्या.