नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेला अधिक प्रभावी बनवण्यात शहा यांच्या प्रशासकीय कौशल्याचे आणि समजूतदारपणाचे मोठे योगदान असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुरुवारी ६२ वर्षांचे झाले आहेत. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले की, शहा यांनी देशातून माओवादाचा (नक्षलवाद) बिमोड करण्यात आणि सरकारचे ड्रग्समुक्त समाजाचे स्वप्न साकार करण्यात विशेष यश मिळवले आहे.
देशाच्या सेवेत त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभावे, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असे पंतप्रधान मोदींनी आपल्या संदेशात म्हटले आहे. २०११ पासून देशाची गृहमंत्रीपदाची धुरा सांभाळणाऱ्या शहा यांच्या नेतृत्वाखाली अंतर्गत सुरक्षेत अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत.