नवी दिल्ली
पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क तीन दिवसांच्या अधिकृत भारत दौऱ्यावर बुधवारी नवी दिल्लीत दाखल झाले. आज (गुरुवारी) ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार असून, यादरम्यान दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्यावर भर दिला जाणार आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, पंतप्रधान टस्कगुरुवारी सकाळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते राजघाट येथे जाऊन महात्मा गांधींच्या समाधीस पुष्पहार अर्पण करतील. यानंतर हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांची औपचारिक बैठक होईल, ज्यामध्ये दोन्ही नेते द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतील आणि संयुक्त निवेदने जारी करतील. या बैठकीत क्षेत्रीय व जागतिक मुद्द्यांवरही सविस्तर चर्चा केली जाणार आहे.
पोलंडचे वित्त व अर्थव्यवस्था मंत्री आंद्रेज डोमान्स्की आणि उच्चस्तरीय व्यापारी प्रतिनिधी मंडळ देखील पंतसोबत भारतात आले आहेत. २०२४ मध्ये पंतप्रधान मोदींच्या पोलंड भेटीदरम्यान दोन्ही देशांचे संबंध 'धोरणात्मक भागीदारी'च्या पातळीवर नेण्यात आले होते. या भेटीमुळे व्यापार, गुंतवणूक, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. गुरुवारी संध्याकाळी पंतप्रधान टस्क बेंगळुरूला रवाना होणार असून, तिथे ते कर्नाटकचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.