समाजातील विविध घटकांनी मतभेद विसरून एकत्र यावे

Story by  पुणे | Published by  Saurabh Chandanshive • 10 d ago
जमात ए इस्लामी हिंद तर्फे मुंबईमध्ये आयोजित सर्वधर्मीय ईद मिलन कार्यक्रम
जमात ए इस्लामी हिंद तर्फे मुंबईमध्ये आयोजित सर्वधर्मीय ईद मिलन कार्यक्रम

 

आपण सर्वजण एकाच ईश्वराची संतान आहोत, आपापसात कधी भांडण तंटा व भेदभाव करू नये. यासाठी सर्वांनी एकमेकांसोबत गुण्यागोविंदाने राहावे, असे प्रतिपादन जळगाव येथील मौलाना मोहमंद समी सहाब यांनी केले. घाटनांद्रा येथे जमाते इस्लामी हिंद शाखेच्या वतीने नुकत्याच झालेल्या ईद मिलन कार्यक्रमात ते बोलत होते.

'जमात ए इस्लामी हिंद'च्या महाराष्ट्र विभागाने या आठवड्यात घाटनांद्राप्रमाणेच महाराष्ट्रभर सर्वधर्मीय ईद मिलनचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सर्वधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यापैकी मुंबई, जालना, माजलगाव, वसमत इत्यादि ठिकाणी आयोजित ईद मिलन कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमासाठी हाफीज खालीद खान, सरपंच यासीन तडवी, उपसरपंच कृष्णा मोरे, कौतिकराव मोरे, वैद्य पद्माकर जोशी, चारनेरचे सरपंच रवींद्रसिंग राजपूत, जमाते इस्लामी हिंद शाखेचे माजी अध्यक्ष शेख इब्राहिम, वामन मोरे, अजित पाटणी, पुरुषोत्तम पवार, मुजिब मुल्ला, सुनील निकम, गड्डू चाऊस, इम्रान पठाण, अशोक गुळवे, कचरू मोरे, रामचंद्र शिंदे आदींसह समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष शेख सलीम यांनी केले.

सूत्रसंचलन साजिद मोहम्मद देशमुख, तर आभार शेख अकिल यांनी मानले. यशस्वीतेसाठी हाफिज खालीद खान, नसीम मुल्ला, हाफिज आसिफ खान, मौलाना मोईज फलाही, सय्यद आबिद, अतीक अहमद, सय्यद जमिर अली, सईद पठाण, सलीम खान, मोईन खान, साकीब खान, अकरम नजिर, सय्यद अबरार, सय्यद मूदससीर, मुकीम मुल्ला, इस्तेयाक रफिक आदींनी परिश्रम घेतले.

वसमत येथेही राष्ट्रीय एकात्मतेसाठी जमाती इस्लामी हिंदचा ईद मिलन उपक्रम
महाराष्ट्रातील इतर भागांप्रमाणेच वसमत येथे जमात इस्लामी हिंद शाखेच्या वतीने ईद मिलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संत साहित्याचे गाडे अभ्यासक डॉ. रफिक पारनेरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर शफी फारुखी, रामचंद्र बागल, दत्तात्रय मानकरी, मौलाना बासित, मौलाना इम्तियाज बरकती, बौद्ध महासभा चे सुनील काळे, संभाजी ब्रिगेड हिंगोली जिल्हाध्यक्ष सतीश पाटील महागावकर आदी उपस्थित होते. डॉ. पानेरकर म्हणाले की,

महिलांसाठी पहिली शाळा काढणारे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या खांद्याला खांदा लावून एका शिक्षिकेची भूमिका बीबी फातिमा शेख यांनी निभावली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विश्वासातले सिपेसालार तसेच अंगरक्षक हे देखील मुस्लिमच होते. आपण सर्व समाज बांधव एकच असून भाऊ भाऊ आहोत. मानवता हा एकच धर्म असून सर्व समाज बांधवांनी एकोप्याने राहून या मूल्यांचे जतन केले पाहिजे.

या कार्यक्रमानंतर उपस्थित सर्वांनी शीरखुर्माचा आस्वाद घेतला. इस्लामी हिंद शाखा वसमतचे अख्तर हुसेन आणि त्यांच्या सहकार्याचे उपस्थितीने आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते.