बॉक्सर मोहम्मद हुसमुद्दीन जागतिक स्पर्धेतून जिंकला कांस्यपदक

Story by  विवेक पानमंद | Published by  vivek panmand • 6 Months ago
बॉक्सिंग खेळाडू मोहम्मद हुसमुद्दीन
बॉक्सिंग खेळाडू मोहम्मद हुसमुद्दीन

 

 मोहम्मद  हुसमुद्दीनने २०२३ च्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये कांस्यपदक मिळवले आहे. तो बॉक्सिंग खेळाडू असून त्याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई चॅम्पियनशिप आणि जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकाची कमाई केली होती. त्याने जागतिक स्पर्ध्येत मिळवलेले विजेतेपद हे मोठे यश आहे.  मोहम्मद हा तेलंगणा राज्यातील आहे. त्याचे वडील आणि भाऊ दोघे बॉक्सिंग खेळाडू होते. 

 
देशातली अनुभवी बॉक्सर मोहम्मद हुसमुद्दीनची २०२३ च्या जागतिक विश्वचषकासाठी निवड झाली होती. यावेळी सर्वाना आश्चर्य वाटले कारण तो पहिल्यांदाच या स्पर्ध्येत भाग घेत होता. अनेकवेळा त्याला या स्पर्धाना मुकावे लागले. यावेळी त्याने संधी साधून ताश्कंदमधून कांस्यपदक घेऊन तो परत आला.
 
 गुडघ्याच्या दुखापतीमुळे उपांत्य फेरीच्या आधी स्पर्ध्येतून माघार घ्यावी लागली, नाहीतर त्याच्या पदकात बदल होऊ शकला असता. मागील १० महिन्यांमध्ये हुमसुद्दीनने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई चॅम्पियनशिप आणि जागतिक चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकाची हॅट्रिक केली आहे. त्याने ५७ किलो वजनी गटात राष्ट्रीय विजेतेपद पटकावले आहे. निजामाबादच्या या बॉक्सरने आपल्या यशाचे श्रेय आपल्या मुलीच्या जन्माला दिले आहे.
 
 हुसामुद्दीन म्हणाला, 'आम्ही बेलफास्टमध्ये प्रशिक्षण घेत असताना माझ्या मुलीचा जन्म झाला होता. त्या वेळी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पार पडायची बाकी होती. मला फक्त हे माहित होते की ती माझ्यासाठी भाग्य आणेल. शेवटी स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे मला आनंद झाला पण क्षणभर पदक जिंकायचे आहे असे देखील वाटून गेले. मला स्वतःला सिद्ध करावे लागले कारण मी पहिले दोन-तीन विश्वचषक गमावले होते. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये, हुसामुद्दीनने त्याचे पहिले तीन सामने सर्वानुमते घेतले, तर उपांत्यपूर्व फेरीत ४-३ अशा फरकाने विजय मिळवला.
 
 हुसामुद्दीनने आपल्या अनुभवाचा स्पर्ध्येच्या दरम्यान पुरेपूर उपयोग केला आणि नवीन परदेशी प्रशिक्षक दिमित्री दिमित्रुक आणि परफॉर्मन्सेस निर्देशक बर्नार्ड ड्युने यांच्या मार्गदर्शनाचा फायदा घेतला. 'मी काही बॉक्सर्सविरुद्ध खेळलो ज्यांच्याशी मी याआधी लढलो होतो, त्यामुळे मला त्यांचा खेळ माहीत होता. प्रशिक्षक आणि मी बसून  योजना आखल्या. प्रशिक्षकाने मला १-२ पंचांवर काम करण्यास सांगितले आणि त्याचा मला खरोखरच फायदा झाला.’, असं तो म्हणतो.
 
 तो पुढे म्हणाला, ‘माझा सामना चांगला चालला होता. पण त्याने मला शेवटच्या १० सेकंदात धक्का दिला तेव्हा माझा तोल गेला. त्यावेळी मला कळले होते की काहीतरी गडबड आहे. फिजिओ आणि डॉक्टरांनी माझी तपासणी केली. दुसऱ्या दिवशी, जेव्हा मी प्रशिक्षणादरम्यान पंच मारण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा मला उभे राहता येत नव्हते की एक पाऊल मागे घेता येत नव्हते. आम्ही सामन्याच्या दिवसापर्यंत थांबायचे ठरवले. मी खूप निराश झालो पण प्रशिक्षकाने मला समजावून सांगितले की मी जरी खेळलो तरी मी माझे १००% देऊ शकणार नाही. दुखापतीचा धोका आहे आणि पुढे महत्वाच्या स्पर्धा येत आहेत. दुखापतीमुळे आपली मोहीम थांबली नसती तर जेतेपद पटकावले असते, असा विश्वास हुसमुद्दीनला होता.
 
हुसमुद्दीनला फिजिओथेरपी करण्याचा सल्ला देण्यात आला असून त्याला निजामाबादमध्ये उपचार करण्याची परवानगी मिळेल अशी आशा आहे. या छोट्या विश्रांतीनंतर त्याची आशियाई खेळांची तयारी सुरू होईल, जी पुढील वर्षीच्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पहिली पात्रता आहे.