नवीन उल हकने आरसीबीच्या पराजयामुळे विराट कोहलीची उडवली खिल्ली

Story by  आवाज़ मराठी | Published by  vivek panmand • 6 Months ago
विराट कोहली आणि नवीन उल हक
विराट कोहली आणि नवीन उल हक

 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक यांच्यातील वाद कोणापासून लपलेला नाही. मैदानातून सुरू झालेला लखनऊ आणि आरसीबीमधील वाद सोशल मीडियावर सुरूच आहे.

 
गुजरातकडून लखनऊच्या पराभवाचे अनेक किस्से विराट कोहलीने इंस्टाग्रामवर शेअर केले होते. यानंतर नवीनने मुंबई इंडियन्सविरुद्ध आरसीबीचा पराभव आणि विराट कोहलीची आंब्यासोबतची विकेट अशी मजा घेतली होती. आता आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्याने नवीनला आणखी एक संधी मिळणार आहे.
 
एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात गतविजेत्या गुजरातविरुद्ध 198 धावांचा बचाव करण्यात आरसीबी अपयशी ठरला. या पराभवामुळे विराट कोहलीचे आयपीएल जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. आरसीबीचा पराभव नवीन उल हकने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक मेम शेअर केला आहे. हा एक टीव्ही अँकर सतत हसताना आणि टाळ्या वाजवताना दिसतो. नवीनने आरसीबी किंवा विराटचे नाव लिहिलेले नाही. पण स्टोरी का ठेवली हे त्याच्या मेसेज वरून स्पष्ट होत आहे.
 
मे महिन्याच्या सुरुवातीला एकना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना झाला. या सामन्यात विराट कोहलीने दहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या नवीन-उल-हकची स्लेजिंग केली. सामना संपल्यावर खेळाडूंनी हस्तांदोलन केल्यावर नवीन आणि कोहली यांच्यात वाद झाला. यानंतर संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातही बाचाबाची झाली. तेव्हापासून नवीन आणि विराटमध्ये वाद सुरू आहे.
 
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएल 2023 च्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. दुसरीकडे तिसऱ्या क्रमांकावर राहिलेला लखनऊ सुपर जायंट्स आता प्लेऑफमध्ये खेळणार आहे. लखनऊचा सामना 24 मे रोजी चेपॉक मैदानावर मुंबई इंडियन्सशी होणार आहे.