चीन पाकव्याप्त काश्मीरमध्ये बांधतोय रस्ता?

Story by  पुणे | Published by  Saurabh Chandanshive • 10 d ago
चीनने POK मध्ये अतिक्रमण केल्याची सॅटेलाईट इमेज
चीनने POK मध्ये अतिक्रमण केल्याची सॅटेलाईट इमेज

 

आपल्या कुरापती सुरुच ठेवल्या आहेत. चीनने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) सियाचिनच्या जवळ रस्ते निर्मिती सुरु केली आहे. काँक्रिटचे हे रोड आहेत. सॅटलाईटच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या छायाचिंत्रामधून ही बाब समोर आली आहे. त्यामुळे भारत आणि चीन या दोन देशांमधील तणाव आणखी वाढणार आहे.

अवैध पद्धतीने ताबा मिळवलेल्या भारताच्या जमिनीवर हा रस्ता बांधला जात आहे. जगातील सर्वात उंचीचे युद्धस्थळ सियाचिनच्या उत्तरेला हा रस्ता आहे. यूरोपियन स्पेस एजेन्सींने सॅटेलाईट छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. त्यातून स्पष्ट दिसतंय की चीन सियाचिनजवळ रस्ते बांधणी करत आहे. संघर्षाच्या काळात चीनला हा रस्ता वाहतुकीसाठी फायद्याचा ठरणारा आहे.

चीनच्या या कुरापतीवर भारताकडून अद्याप कोणतंही अधिकृत वक्तव्य आलं नाही. पण, दोन्ही देशांमध्ये आणखी तणाव वाढेल हे नक्की. याआधीही चीनकडून सीमेवर कुरापती झाल्या आहेत. भारताने वारंवार याला विरोध केला आहे. पण, चीनला अजूनही शहाणपण सूचलेलं नाही. चीनने एलएसीमध्ये रस्ते बांधणी याआधीही केली आहे. भारताने यावर आक्षेप घेतला होता.

पीओकेचा एक भाग चीनच्या ताब्यात आहे. १९६३ मध्ये ही भारताची जमीन चीनच्या ताब्यात गेली होती. याठिकाणी शक्सगम खोऱ्यात चीन हायवे जी-२१९ चा विस्तार करत आहे. चीनच्या शिवजियांग प्रातांजवळ ही रस्तेबांधणी होत आहे. सियाचिन ग्लेशियरमध्ये इंदिरा कोल हा प्रदेश आहे. याठिकाणापासून ५० किलोमीटर उत्तर दिशेला ही रस्ते बांधणी होत आहे.

पाकिस्तानची रस्ते बांधणीची ही तयारी आत्ताची नाही. गेल्या वर्षांपासूनच चीन याची तयारी करत होता अशी माहिती मिळत आहे. चीनने मागील वर्षी जून आणि ऑगस्टमध्ये कच्चा रस्ता तयार केला होता. त्यानंतर आता याचे क्राँकिटीकरण होत आहे. दरम्यान, गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. याकाळात चीनकडून भारताचा काही भाग मिळवला असल्याचं बोललं जातंय.