करीना कपूर बनली UNICEFची नॅशनल ब्रँड ॲम्बेसेडर

Story by  Saurabh Chandanshive | Published by  Saurabh Chandanshive • 13 d ago
करीना कपूर
करीना कपूर

 

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर सध्या तिच्या क्रू चित्रपटामुळे बरीच प्रकाशझोतात आहे. तिच्या ह्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केलेली आहे. कायमच तिच्या अभिनयाचेही आणि तिच्या सौंदर्याचेही जोरदार कौतुक चाहत्यांकडून होते.

सध्या करीना कपूर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीला युनिसेफकडून महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. अभिनेत्री आता युनिसेफची नॅशनल ॲम्बेसिडर झालेली आहे.

गेल्या १० वर्षांपासून म्हणजेच २०१४ पासून अभिनेत्री युनिसेफसोबत संलग्नित आहे. तिच्यावर फार मोठी जबाबदारी दिल्यामुळे ती भावूक झालेली आहे. तिने सोशल मीडियाव एक पोस्ट शेअर केलेली आहे, त्यामध्ये ती भावूक झालेली आहे.

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर UNICEF India च्या कार्यक्रमातील काही फोटो शेअर केलेले आहेत. फोटो शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले की, "माझ्यासाठी आजचा दिवस फारच इमोशनल राहिला आहे. मला UNICEF India ची नॅशनल ॲम्बेसिडर म्हणून नियुक्त केल्याबद्दल स्वत: ला खूप चांगले वाटत आहे. सध्या माझ्या सन्मानार्थ भावना आहेत. गेल्या १० वर्षांपासून मी UNICEF India सोबत काम करते. त्यांच्यासोबत काम करताना मला समृद्ध आणि ज्ञानवर्धक वाटले."

करीनाने पुढे पोस्टमध्ये लिहिले की, "त्यांच्यासोबत केलेल्या कामाचा मला सार्थ अभिमान आहे. मी 10 वर्षांपासून मुलांच्या हक्कांसाठी काम करत आहे. त्यांच्या भविष्यासाठी त्यांचा आवाज बनून कायमच मी काम करत राहणार आहे. मी नेहमीच या संस्थेसोबत राहून काम करेल. लहान मुलांच्य हक्कासाठी कटीबद्ध राहिल." UNICEF म्हणजे (The United Nations International Children's Emergency Fund...) ही संस्था १९० देशांमध्ये कार्यरत आहे. जगभरातल्या मुलांचे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि त्यांचा संपूर्ण विकास हे या संस्थेचं उद्दिष्ट आहे.

करीना कपूर खानच्या कामाबद्दल बोलायचे तर, अभिनेत्री शेवटची 'क्रू' चित्रपटांत दिसली होती. तिच्या सोबत क्रिती सेनन आणि तब्बू प्रमुख भूमिकेत होती. त्यानंतर ती 'सिंघम अगेन' मध्येही प्रमुख भूमिका साकारणार आहे. तर केजीएफ स्टार यशच्या 'टॉक्सिक' चित्रपटातही ती होती. पण तिने या प्रोजेक्टमधून एक्झिट घेतल्याचे समजत आहे. चित्रपटामध्ये करीना यशच्या बहिणीची भूमिका साकारणार होती.