पाकिस्तानी कंटेंटवर भारतात बंदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 8 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारतात चालवल्या जात असलेल्या सर्व ओटीटी (ओव्हर दि टॉप) प्लॅटफॉर्म्सनी पाकिस्तानात तयार करण्यात आलेला सर्व प्रकारचा आशय (कंटेंट) प्रसारित करणे थांबवावे, असे निर्देश माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाने दिले आहेत. वेबसिरीज, चित्रपट, स्ट्रीमिंग, गाणी, पॉडकास्टसह सर्व प्रकारच्या आशयावर सरकारने बंदी घातली आहे. एखादा आशय सशुल्क असले तरीही तो प्रसारित करण्यास मनाई केली आहे.

'ऑपरेशन सिंदूर' च्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी आशय भारतात चालविण्यास मनाई करण्यात आली आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे गत महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानचा संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानी कंटेंटवर बंदी घातली जात असल्याचे सरकारने म्हटले आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर सरकारने पाक कलाकारांवर तसेच भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या असंख्य युट्यूब चॅनेल्सवर बंदी घातली होती. पाकमधले दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले असले तरी 'ऑपरेशन सिंदूर' अद्याप थांबलेले नाही, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.