आमिर खानने आपल्या नव्या चित्रपट ‘सितारे जमीन पर’चा पहिला पोस्टर नुकताच सादर केला. २००७ मधील यशस्वी ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. आर.एस. प्रसन्ना यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट २० जूनला चित्रपटगृहात येणार आहे. काही अडचणींमुळे याचे प्रदर्शन दोनदा पुढे ढकलण्यात आले. आमिरसोबत जेनेलिया डिसुझा या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.
चित्रपटाच्या पोस्टरमध्ये आमिर नाखुश दिसत आहे. त्याच्या सभोवताली दहा मुले दिसत आहेत. आमिरचा कोपर बास्केटबॉलवर टेकलेला आहे. यावरून बास्केटबॉल या चित्रपटात महत्त्वाची भूमिका निभावणार असल्याचे दिसते. ‘तारे जमीन पर’मध्ये चित्रकला केंद्रस्थानी होती, तसेच यात बास्केटबॉल असेल. आता आमिर खान प्रॉडक्शन्स या चित्रपटातून दहा नव्या कलाकारांना संधी देत आहे.
अरौश दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, समवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भन्साळी, आशिष पेंडसे, रिषी शहाणी, रिषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर या चित्रपटातून पदार्पण करत आहेत. पोस्टरमध्ये या मुलांची स्वतःची अशी खास शैली आणि व्यक्तिमत्त्व दिसते. ही पात्रे आमिरच्या भोवती उभे आहेत.
आमिरने आपल्या पात्राबद्दल सांगितले की, “‘तारे जमीन पर’मधील माझे पात्र खूप संवेदनशील होते. या चित्रपटात माझ्या पात्राचे नाव गुलशन आहे. पण त्याचे स्वभाव आधीच्या पात्रापेक्षा पूर्णपणे उलट आहे. तो खूप उद्धट आहे. तो राजकीयदृष्ट्या चुकीचे बोलतो. सगळ्यांचा अपमान करतो. तो पत्नी आणि आईशी भांडतो. तो बास्केटबॉल प्रशिक्षक आहे. आपल्या वरिष्ठ प्रशिक्षकाला मारतो. त्याला अनेक वैयक्तिक समस्या आहेत."
तो पुढे म्हटलं, “हा चित्रपट गुलशनच्या बदलाची कहाणी आहे. डाऊन सिंड्रोम, ऑटिझम आणि इतर विशेष क्षमता असलेले दहा लोक त्याला चांगले माणूस कसे बनायचे हे शिकवतात. हा मूळ स्पॅनिश चित्रपट आहे. आम्ही त्याची भारतीय आवृत्ती बनवली आहे,” असे आमिरने स्पष्ट केले. ‘सितारे जमीन पर’ हा २०१८ मधील स्पॅनिश क्रीडा विनोदी चित्रपट ‘कॅम्पियोन्स’चा हिंदी रिमेक आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक आर.एस. प्रसन्ना यांनी २०१७ मध्ये ‘शुभ मंगल सावधान’ हा यशस्वी चित्रपट दिला. त्यांनी स्वामी चिन्मयानंद सरस्वती यांच्या जीवनावरील ‘ऑन अ क्वेस्ट’ हा चित्रपटही बनवला. पटकथा दिव्य निधी शर्मा यांनी लिहिली आहे. निर्मिती आमिर खान आणि अपर्णा पुरोहित यांनी केली. गीते अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिली असून संगीत शंकर-ईसान-लॉय यांचे आहे.