नेटफ्लिक्सनंतर आता डिज्नीनेही बंद केली 'ही' सुविधा

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 2 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

गेल्या वर्षी नेटफ्लिक्सने एकच अकाउंट अनेक लोकांनी वापरू नये यासाठी पासवर्ड शेअरिंग सुविधा बंद केली होती. यानंतर डिज्नी प्लसने देखील कॅनडामध्ये अशा प्रकारचा निर्णय लागू केला होता. आता मात्र जगभरातील सर्व यूजर्सना हाच निर्णय लागू करणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे.

डिज्नीचे चीफ फायनॅन्शिअल ऑफिसर ह्यूज जॉन्सटन यांनी याबाबत माहिती दिली. यामुळे आता एखाद्या व्यक्तीने जर दुसऱ्यांच्या अकाउंटने लॉग-इन केलं, तर तिथे नवीन साईन-अप विंडो किंवा सबस्क्रिप्शन अपडेट विंडो ओपन होईल.

मार्चपासून होणार लागू
डिज्नीची नवी पासवर्ड शेअरिंग पॉलिसी २०२४ च्या मार्चपासून सुरू होणार आहे. अर्थात, हे कशा प्रकारे लागू होईल याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, नेटफ्लिक्सने ज्याप्रमाणे एकाच घरातील राहणाऱ्या व्यक्तींसोबत पासवर्ड शेअर करण्याची परवानगी दिली आहे, त्याचप्रमाणे डिज्नी+ देखील निर्णय घेऊ शकते.

एक्स्ट्रा चार्ज
नेटफ्लिक्सने नवीन पासवर्ड शेअरिंग पॉलिसी सुरू केल्यानंतर यूजर्सना एक सुविधा दिली होती. यामध्ये यूजर्स ७.९९ डॉलर्समध्ये घराबाहेरच्या व्यक्तींनाही आपल्या अकाउंटमध्ये जोडून घेऊ शकतात. अशा प्रकारची सुविधा डिज्नी प्लस देणार का याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. पासवर्ड शेअरिंग व्यतिरिक्त कंपनी जाहिरातींचा समावेश देखील करू शकते, असं म्हटलं जात आहे.