बॉलीवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शिका फराह खान या ऋषिकेशला पोहोचल्या आहेत. त्यांनी तिथे गंगा आरतीत उत्साहाने सहभाग घेतला आहे. गंगा आरतीचा अनुभवाला त्यंनी जादुई म्हटले आहे. सोशल मीडियावर फराह खान यांचा डोक्यावर ओढणी आणि कपाळावर टिळा लावलेले छायाचित्रे व्हायरल झाले आहेत. त्यात त्या मोठ्या भक्तीभावाने हात जोडून गंगा आरतीत सहभागी झाल्या आहेत. इतकेच नाही तर त्यांनी गंगा पूजेतही भाग घेतला आहे. चाहत्यांना फराह खान यांचा हा अंदाज खूप आवडला आहे. सोशल मीडियावर चाहते त्यांचे कौतुक करत आहेत.
फराह खान त्यांच्या यूट्यूब व्लॉगमुळे नेहमीच चर्चेत असतात. फराह यांनी त्यांच्या सोशल मिडियावरून गंगा आरतीचा जादुई अनुभव सांगितला आहे. फराह खान प्रथमच ऋषिकेशला गेल्या होत्या. तिथे त्यांनी गंगा आरतीचा अनुभव घेतला आहे. गंगा आरतीचा अनुभव त्यांनी जादुई म्हटला आहे. फराह खान यांच्या व्यवस्थापकाने सोशल मीडियावर त्यांची ऋषिकेशमधील छायाचित्रे शेअर केली आहेत.
छायाचित्राने जिंकली मने
फराह खान या ऋषिकेशमधील छायाचित्रांमध्ये ती गंगा आरतीपूर्वी डोक्यावर ओढणी घेऊन सहभागी झाल्या आहे. त्यांनी गंगा पूजेतही भाग घेतला आहे. त्या गंगेला दिवा अर्पण करताना दिसत आहेत. या पोस्टवर टिप्पणी करताना फराह यांनी गंगा आरतीतील सहभागाचा अनुभव शेअर केला आहे. त्यांनी सांगितले की गंगा आरतीत सहभागी होण्याचा अनुभव जादुई होता. यापूर्वी त्यांनी असा अनुभव कधीच घेतला नव्हता.