फातिमा शेखने चित्रपटसृष्टीबद्दल केला मोठा खुलासा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 6 h ago
अभिनेत्री फातिमा सना शेख
अभिनेत्री फातिमा सना शेख

 

दंगल, 'लूडो' आणि 'सॅम बहादूर' सारख्या चित्रपटांत दमदार भूमिका करणारी अभिनेत्री फातिमा सना शेख हिने अलीकडेच एका मुलाखतीत चित्रपटसृष्टीतील तिचे सुरुवातीचे अनुभव शेअर केले आहेत. विशेषतः जेव्हा ती साईड रोलमध्ये असायची, तेव्हा सेटवर तिच्याशी दुय्यम वागणूक दिली जात होती. "प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये नेपोटिझम असतंच. मी मुख्य भूमिका केल्या आहेत आणि लहान भूमिकादेखील त्या दोन्हींचा फरक मी अनुभवला आहे." असं ती म्हणाली. 

फातिमाने सांगितलं की, सेटवर सहकलाकारांनी कधी कधी जाणूनबुजून स्पॉटलाइट चोरण्याचा प्रयत्न केला. एका रॅपिड फायर राउंडमध्ये तिने सांगितलं, "एक महिला सहकलाकार प्रत्येक सीन स्वतःकडे खेचायची. ती भूमिका माझी असतानाही ती सतत पुढे यायची, ही गोष्ट चिडचिड करणारी होती, पण मी माझ्या स्वभावात फरक पडू दिला नाही." बालकलाकार म्हणून 'इश्क' आणि 'चाची ४२०'मधून प्रवास सुरू करून 'दंगल'मधून प्रसिद्धी मिळवलेली फातिमा सध्या 'मेट्रो... इन दिनों' या आगामी चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट ४ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.