इंडिया रायझिंग: रेडिओ कुवेतवर आता हिंदी कार्यक्रम

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 11 d ago
रेडिओ कुवेत
रेडिओ कुवेत

 

अरब देशातील भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कुवेतमध्ये पहिले हिंदी रेडिओ प्रसारण सुरू झाले आहे. रेडियो कुवेतकडून ही विशेष प्रस्तुती केली जाणार आहे. कुवेतच्या माहिती मंत्रालयाने एफएम 93.3 आणि AM 96.3 वर कुवेत रेडिओवर दर रविवारी हिंदी कार्यक्रम सुरू केले आहेत. कुवेतमधील भारतीय दूतावासाने या उपक्रमाचे स्वागत केले आहे. 

कुवेतमधील भारतीय दूतावासाने ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे की, "हे पाऊल दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करेल . दर रविवारी FM 93.3 आणि AM 96.3 वर कुवेत रेडिओवर हिंदी कार्यक्रम सुरू केल्याबद्दल भारतीय दूतावास कौतुक करतो. 21 एप्रिल 2024 पासून हा कार्यक्रम  रात्री 8.30-9 या वेळेत प्रसारित होईल. एक पाऊल जे भारत-कुवैत संबंध यामुळे आणखी दृढ होतील.”

कुवेतमधील भारतीय दूतावासानुसार, अंदाजे दहा लाख लोकसंख्या असलेला भारतीय समुदाय कुवेतमधील सर्वात मोठा प्रवासी समुदाय आहे. कुवैती नागरिकांशी भारतीयांशी संबंध सलोख्याचे आहेत.  या भारतीयांमध्ये व्यापारी, अभियंते, डॉक्टर, सनदी लेखापाल, वैज्ञानिक, सॉफ्टवेअर तज्ञ, व्यवस्थापन सल्लागार, वास्तुविशारद, तंत्रज्ञ आणि परिचारिका, किरकोळ विक्रेते यांचे प्रमाण अधिक आहे. 

कुवेतमधील भारतीय व्यापारी समुदायाने किरकोळ आणि वितरण क्षेत्रात कुवैती बाजारपेठेत एक विशेष स्थान निर्माण केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, भारत आणि कुवेत यांच्यात पारंपारिकपणे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. या संबंधांची पाळेमुळे  इतिहासात खोलवर रुजली आहेत आणि काळाच्या कसोटीवर हे संबंध खरे उतरले आहेत.

भारत हा कुवेतचा नैसर्गिक व्यापारी भागीदार आहे. 1961 पर्यंत कुवेतमध्ये भारतीय रुपयाचा चलन म्हणून उपयोग हॉट होता. 2021-22 मध्ये दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त 17 एप्रिल रोजी कुवेतमधील भारतीय राजदूत आदर्श स्वाईका  यांनी कुवेतचे उपपंतप्रधान शेख फहद युसेफ सौद अल-सबाह यांची भेट घेतली आणि आढावा घेतला. यावेळी  उपपंतप्रधानांच्या कार्यकाळात उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

यावेळी भारतीय राजदूतांनी त्यांना भारतीय समुदायातील घडामोडींची आई विकासातील त्यांच्या योगदानाची माहिती दिली आणि गृहमंत्री शेख फहाद युसूफ सौद यांनी सुरू केलेल्या प्रवासी भारतीयांच्या अनुकूल उपक्रमांनासाथी त्यांचे आभार मानले.