तावी नदीवरील पूल ढासळल्यानंतर लष्कराची जलद कामगिरी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 7 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारतीय लष्कराने भगवतीनगरजवळ तावी नदीवर चौथ्या बेली ब्रिजचे काम बारा तासांत पूर्ण केले. काही दिवसांपूर्वी प्रचंड पाऊस आणि नदीची पातळी वाढल्याने या पुलाचा एक भाग वाहून गेला होता. मेजर सोमनाथ चौक ते भगवतीनगर यांना जोडणाऱ्या बेली ब्रिज उभारला निर्मिती केली असून तो लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे तावी नदीवरील चौथ्या पुलाच्या दोन्ही बाजूंकडील भागाची हानी झालो आणि त्यामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झाली. वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा पुल सुरू करणे गरजेचे असताना लष्कराने बेली ब्रिजचे काम हाती घेतले आणि बारा तासांत पूर्ण केले. यादरम्यान, भगवतीनगर ते नेहरू मार्केटदरम्यान, असणाऱ्या पुलाच्या दुसऱ्या भागाच्या दुरुस्तीसाठी वेळ लागणार आहे. कारण यासाठी सरकारची परवानगी लागणार असून तेथे काम करताना पुलाच्या अन्य भागात असलेल्या मेजर सोमनाथ यांचा पुतळा तात्पुरत्या काळासाठी काढावा लागणार आहे. 

बरिष्ठ पोलिस अधीक्षक फारुख कैसर यांच्या माहितीनुसार, नदीची पातळी वाढल्याने पुलाचा काही भाग वाहून जाण्याची घटना मंगळवारी बडली. या पुलाचा एक भाग २६ ऑगस्ट रोजी ढासळला आणि तातडीने लष्कराने बेली ब्रिजसाठी पुढाकार घेतला.