भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात 'इस्रो'ने पुढील वर्षी मार्चपर्यंत सात प्रक्षेपण मोहिमांचे नियोजन केले आहे. स्वदेशी इलेक्ट्रिक प्रॉपल्शन सिस्टीम, क्वांटम की वितरण तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक आणि 'गगनयान' प्रकल्पातील पहिली मानवरहित मोहीम आदींचा त्यात समावेश आहे. या मोहिमांपैकी पहिले प्रक्षेपण पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
भारताचे सर्वांत जड प्रक्षेपक वाहन 'एलव्हीएम-३' अमेरिकेतील 'एएसटी स्पेसमोबाइल' या कंपनीसाठी व्ल्यूवर्ड-६' दूरसंचार उपग्रह कक्षेत स्थापित करणार आहे. 'इस्रो'ची सहयोगी 'न्यू स्पेस इंडिया लिमिटेड'ने यांच्यासोबत झालेल्या व्यावसायिक करारांतर्गत हे प्रक्षेपण होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी नुकतीच संसदेत दिली.
खासगी 'पीएसएलव्ही'
पुढील वर्षी भारतातील खासगी उद्योगक्षेत्राने तयार केलेला ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाची (पीएसएलव्ही) चाचणी घेतली जाणार असून, तो 'ओशनसेंट' उपग्रह कक्षेत स्थापित करेल. या 'पीएसएलव्ही'च्या माध्यमातून आणखी दोन उपग्रहांचे प्रक्षेपण केले जाईल. इंडो-मॉरिशस संयुक्त उपग्रह आणि 'ध्रुव स्पेस'चा 'एलईएपी-२' उपग्रह अवकाशात झेपावणार आहे. उपग्रहांच्या व्यावसायिक प्रक्षेपणांना चालना देण्यासाठी 'एनएसआयएल ने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) यांच्यासह पाच 'पीएसएलव्ही' रॉकेट्स तयार करण्याचा करार केला आहे. हा तंत्रज्ञान हस्तांतरण करार यंदा सप्टेंबरमध्ये करण्यात आला आहे.
द्रवरूप इंधनाची गरज घटणार
चार टन वजनाच्या एका संप्रेषण उपग्रहामध्ये दोन टनांहून अधिक द्रव इंधन असते. हे इंधन अवकाशात उपग्रहाची दिशा नियंत्रित करण्यासाठी वापरले जाते. मात्र, इलेक्ट्रिक पपल्शन सिस्टीमच्या बाबतीत इंधनाची गरज केवळ २०० किलोपर्यंत कमी होते, असे इस्तो 'तील शास्त्रज्ञांनी सांगितले. इंधनाचे वजन कमी झाल्यामुळे विद्युत प्रणालीवर आधारित उपग्रहाचे एकूण वजन दोन टनपिक्षा जास्त नसते. मात्र, त्याची कार्यक्षमता चार टन वजनाच्या उपग्रहइतकीच असते. त्यामुळे येत्या काळात या स्वरूपाचे तंत्रज्ञान अधिकाधिक वापरण्याचे नियोजन 'इस्रो'कडून करण्यात आले आहे.
'व्योममित्रा' रोबो
मानवी उड्डाणाच्या तयारीसाठी 'एलव्हीएम-३' रकिट पुढील वर्षाच्या सुरुवातीला आकाशात झेपावेल, या रॉकेटद्वारे भारताच्या मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम 'गगनयान'ची पहिली परीक्षा होईल. या मोहिमेत 'व्योममित्रा' हा रोबो क्रू मॉडयूलमध्ये असणार आहे. भारतीय अंतराळवीरांना २०२७मध्ये निम्न पृथ्वी कक्षेत पाठवण्यापूर्वी आणखी एक मानवरहित मोहीम पुढील वर्षाच्या उत्तरार्धात नियोजित आहे. "गगनयानच्या पहिल्या मानवरहित मोहिमेत संपूर्ण मिशनचे प्रात्यक्षिक दाखवले जाईल, यामध्ये मानवी उड्डाणासाठी प्रमाणित प्रक्षेपण वाहनाची एरोडायनॅमिक्स वैशिष्ट्ये, ऑर्बिटल मॉडयूलचे मिशन ऑपरेशन्स आदींचा समावेश आहे," असे जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.
हे आहेत महत्त्वाचे प्रकल्प
'इस्रो'ने तयार केलेले रॉकेट पृथ्वी निरीक्षण उपग्रह; तसेच आंतरराष्ट्रीय ग्राहकांचे १८ लहान उपग्रह कक्षेत पाठवणार आहे.
'जीएसएलव्ही मार्क-२' रॉकेटद्वारे पृथ्वी निरीक्षण उपग्रह सन २०२१ मध्ये अपेक्षित कक्षेत पोहोचण्यात अपयशी ठरलेल्या 'जीसॅट-१'च्या जागी कार्य करील.
'इस्रो'ची पीएसएलव्ही-६३ मोहीम टीडीएस-०१ उपग्रह कक्षेत स्थापित करेल. या उपग्रहाद्वारे उच्च विद्युत प्रणोदन प्रणाली, क्वांटम की वितरण तंत्रज्ञान आणि स्वदेशी ट्रॅव्हलिंग वेव्ह ट्यूब ऑप्लफायर यांसारख्या तंत्रज्ञानांचे प्रात्यक्षिक दाखवले जाईल. 'इलेक्ट्रिक प्रॉपल्शन सिस्टीम' मुळे 'इस्रो'ला भविष्यात पूर्णपणे इलेक्ट्रिक स्वरूपातील उपग्रह प्रक्षेपित करणे शक्य होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे उपग्रहांचे वजन कमी होईल आणि रासायनिक इंधनांवरील अवलंबित्व घटेल.
स्वदेशी टीडब्ल्यूटी (ट्रॅव्हलिंग वेव्ह टयूब) अॅप्लिफायरमुळे उपग्रहावरील प्रक्षेपकाच्या महत्वाच्या तंत्रज्ञानात 'आत्मनिर्भरता' साध्य होईल, असे 'इस्रो'च्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
'स्मॉल सॅटेलाइट लाँच व्हेईकल 'देखील मार्च २०२६ पूर्वी एक उपग्रह प्रक्षेपित करणार आहे.