महाविकास आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीत 'इतके' उमेदवार द्यावेत

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 12 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीत २४ जागांवर मुस्लिम उमेदवारांची घोषणा करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हुसैन दलवाई यांनी केली. मुस्लिम मतदारांची टक्केवारी जास्त असलेल्या विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने मुस्लिम उमेदवार द्यावेत असे ते म्हणाले. यासाठी त्यांनी टक्केवारी निहाय मतदारसंघाचा अहवाल तयार केला आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मुस्लिम मतदारांनी मविआला मतदान केले. मात्र मविआने एकही मुस्लिम उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे आता उमेदवार द्यावेत असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील मुस्लिमांची संख्या साडेअकरा टक्के आहे, त्यानुसार मुस्लिमांना ३२ विधानसभांची उमेदवारी मिळाली पाहिजे. मात्र असे होऊ शकत नाही. म्हणून आम्ही अभ्यास करुन एक अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार मुस्लिम मतदारांची संख्या जास्त असलेल्या २४ जागांवर उमेदवारी देता येईल, असे ते म्हणाले.

त्यांच्या अहवालानुसार मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त ७८.४ टक्के मुस्लिम मतदार आहेत. तर मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर ५३ टक्के, भिवंडी पूर्व ५१ टक्के, मुंबादेवी ५०.९ टक्के, भिवंडी पश्चिम ४९.५ टक्के मुस्लिम मतदार असल्याचा दावा दलवाई यांच्या अहवालात आहे. यासह इतर विभागातील मुस्लीम बहुल ५२ विधानसभा मतदारसंघांचा या अहवालात समावेश त्यांनी केला आहे.
 
२०१९ च्या विधानसभेत एकूण १० मुस्लिम आमदार निवडून गेले होते. 

हे आहेत सध्याच्या विधानसभेतील मुस्लीम आमदार

  • समाजवादी पक्षाचे 
  1. अबू आसिम आझमी 
  2. रईस शेख
  • राष्ट्रवादी कॉँग्रेस                                             
  1. नवाब मलिक
  2. हसन मुश्रीफ
  • काँग्रेस पक्षाचे  
  1. अस्लम शेख  
  2. अमीन पटेल  
  3. झीशान सिद्दीकी
  • शिवसेना  
  1.  अब्दुल सत्तार 
  • एमआयएम    
  1. शाह फारुख अन्वर
  2.  मुफ्ती मोहम्मद इस्माईल

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter