लोकसभेचा प्रचार संपल्यानंतर काय करणार पंतप्रधान?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Sameer Shaikh • 26 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा आता शेवटचा टप्पाच शिल्लक राहिला आहे. त्यानुसार १ जून रोजी आठ राज्यांमध्ये एकूण ५७ मतदारसंघांमध्ये सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. मतदानाचा हा टप्पा पार पडल्यानंतर काय करायचं? याचा मोठा निर्णय पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. 

१ जून रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान असल्यानं दोन दिवस म्हणजेच ३० मे रोजी प्रचार संपणार आहे. त्यानंतर ३० मेच्या संध्याकाळपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकावरील रॉक मेमोरियल इथल्या ध्यान मंडपममध्ये ध्यानाला बसणार आहेत. २४ तासांसाठी ते ध्यानस्थ अर्थात मौनव्रत करणार आहेत.

दरम्यान, मोदींनी यापूर्वी सन २०१९ च्या निवडणुकीनंतर केदारनाथ इथं अशाच प्रकारे एका गुहेमध्ये भगवं वस्त्र धारण करुन ध्यान धारणा केली होती. मोदींनी यावेळी कन्याकुमारीमधील विवेकानंद स्मारकंच का निवडलं यामागचं कारण सांगताना सांगितलं की, स्वामी विवेकानंद यांचं देशासाठीचं जे व्हिजनं होतं ते पुन्हा आणण्याच्या हेतूनं याची निवड केली आहे, असं भाजपकडून सांगण्यात आलं आहे.