रमजाननिमित्त विदेशी खजुरांची आवाक

Story by  Awaz Marathi | Published by  Chhaya Kavire • 1 Months ago
सोलापूर बाजारपेठेतील विक्रेते व ग्राहक
सोलापूर बाजारपेठेतील विक्रेते व ग्राहक

 

रमजान महिन्यानिमित्त वर्षभर अगदी तुरळक मिळणारे दर्जेदार खजुराचे प्रकार सोलापूर बाजारात आले आहेत. कबकब, सुलतान, नुरी, किमिया, इराणी आदी प्रकारच्या खजुरांची मागणी चांगलीच वाढली आहे. स्नेहींना भेट देण्यासाठी व उपवास सोडण्यासाठी खजुरांची मागणी मोठी असते. 

रमजान महिन्याच्या निमित्त बाजारात खजुरांची बाजार अगदी जोरात सुरू आहे. खजुरांची आवक अरब देशांमधून मोठ्या प्रमाणात होते. दुबई हे खजूर बाजाराचे केंद्र आहे. तेथून मोठ्या प्रमाणात मालाची आवक होत आहे. या शिवाय इराण, जॉर्डन आदी देशातून खजुरांची आयात होते. 

आकर्षक पॅकींग, सीडलेस, चवीत मधुरतेमुळे खजुरांची विक्री होते. रमजानमध्ये उपवासामध्ये खजूर अधिक आरोग्यदायी ठरतो. आहारात काही खजूर खाण्याची पद्धत आहे. भरपूर पोषण मूल्ये असलेल्या खजुरांची मागणी खूप अधिक वाढली आहे. शहरातील विविध भागात खजुरांची स्वतंत्र दुकाने देखील थाटली गेली आहेत. सर्वसाधारण पेंड खजर वर्षभर बाजारात असते. तीचे भाव सर्वात कमी असतात. पण विदेशातून आलेल्या खजुरांचे प्रकार वैविध्यपूर्ण चवीचे असतात त्यामुळे त्याला मागणी देखील अधिक असते. 
 
ठोक खजूर विक्रेता अबुबकर सालार म्हणाले, "यावर्षी खजुरांची आवक चांगली आहे. रमजानमुळे बाजारात मागणी देखील भरपूर असते. अगदी रमजान ईदपर्यंत ही मागणी वाढलेली असते. दरात फारसा फरक पडलेला नाही." तर, सुका मेवा विक्रेता राम संगतानी म्हणाले, "यावर्षी हंगामात खजुरांची मागणी अद्याप फारशी वाढलेली नाही. मात्र पुढील काळात दर देखील स्थीरच राहतील असा अंदाज आहे. बाजारात मागणी वाढणे गरजेचे आहे." 

खजुराचे प्रकार 
  • कबकब 
  • सुलतान 
  • इराणी 
  • किमिया 
  • नुरी 
  • मेडझॉल 
  • कलमी 
  • पराग 
  • रुतफ 
  • अजवाह 
  • जॉर्डन 
 
खजुरांचे ठोक दर (प्रतिकिलो) 
  • साधी पेंड खजूर - ७५ रुपये 
  • कलमी ९०० रुपये 
  • नुरी ७०० रुपये 
  • मेडझॉल १३०० रुपये 
  • पराग ४५० रुपये 
  • सुलतान ४०० रुपये 
  • किमिया ३०० रुपये 

 

- प्रकाश संपुरकर, सोलापूर  

 


 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज, पॉडकास्ट आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -


Awaz Marathi WhatsApp Channel 
Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter